Breaking News

Tag Archives: maharashtra government

गुन्हा दाखल झालेल्या विझक्राप्ट कंपनीलाच पुन्हा मँग्नेटीक महाराष्ट्रचे काम राज्य सरकारला विसर आपल्याच निर्णयाचा

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या मेक इन इंडिया कार्यक्रमातंर्गत गिरगाव चौपटीवर आयोजित करण्यात आलेल्या संगीत रजनीत आग लागली. त्यामुळे बेशिस्त नियोजन करणाऱ्या विझक्राफ्ट कंपनीला काळ्या यादीत टाकत त्याविरोधात कारवाई करत गुन्हा दाखल केला. मात्र या आपणच दाखल केलेल्या गुन्ह्याचा पूर्ण विसर पडत राज्य सरकारने पुन्हा त्याच कंपनीला …

Read More »

पुढील ४८ तासात विदर्भ, मराठवाड्यात आणखी वादळीवाऱ्यासह गारपिटीचा अंदाज शेतकऱ्यांनी शेतमालाच्या बचावासाठी उपाय योजण्याचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी भारतीय हवामान खात्याच्या नागपूर व मुंबई केंद्राकडून मिळालेल्या सूचनेनुसार, येत्या ४८ तासांमध्ये विदर्भामध्ये (विशेषत: अमरावती आणि नागपूर विभाग) वादळीवारा, वीज व प्रामुख्याने गारपीट होण्याची तसेच  मराठवाड्याच्या बहुतांश भागात वादळीवारा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या भागातील शेतकऱ्यांनी दक्षता घेण्याचे आवाहन मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षाने केले. वादळी वारा व गारपीटीच्या पार्श्वभूमीवर यामध्ये शेतमाल …

Read More »

आणि राज्य सरकारची वेबसाईट क्रँश झाली लाखो नागरीकांची झाली निराशा

मुंबई : प्रतिनिधी डिजीटल महाराष्ट्राचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यात महाराष्ट्र सरकारच्या संपूर्ण निर्णयाची माहिती पोचविणारे राज्य सरकारच्या मालकीचे महाराष्ट्र हे संकेतस्थळ क्रँश झाले. त्यामुळे राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती घेण्यासाठी संकेतस्थळावर धाव घेणाऱ्या लाखो नागरीकांची मोठी निराशा झाल्याने नागरींकामध्ये नाराजी निर्माण झाली. राज्य सरकारच्या जवळपास ३६ विभागांसह नव्याने निर्माण झालेल्या आणखी …

Read More »

संरक्षण, अंतराळ, इलेक्ट्रीक वाहन धोरणासह चार महत्वाच्या धोरणांना लवकरच मंजुरी महाराष्ट्रातील गुंतवणूकीसाठी राज्य सरकार मंत्रिमंडळ बैठकीत घेणार निर्णय

मुंबई: प्रतिनिधी गतवेळी मेक इन महाराष्ट्रमधून गुंतवणूकवाढीच्या अनुषंगाने ईज ऑफ डुईंग बिजनेसची पॉलसी आणत विविध क्षेत्रात सांमजस्य करार करण्यात आले. मात्र त्यास म्हणावे तसा प्रतिसाद मिळाला नसल्याने मँगन्गेटीक महाराष्ट्रच्या नव्या कार्यक्रमांतर्गत राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी संरक्षण धोरण, अंतराळ संशोधन, लॉजीस्टीक धोरण आणि इलेक्ट्रीक वाहन धोरण लवकरच मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती …

Read More »

ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार राज्य सरकारकडून पुरस्कार जाहीर

मुंबई: प्रतिनिधी मागील पाच दशंकाहून अधिक काळ चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून रसिकांची सेवा करणारे, चित्रपटांसोबतच माहितीपट, लघुपट आणि मालिकांचेही यशस्वी दिग्दर्शन-निर्मिती करणारे सर्जनशील ज्येष्ठ दिग्दर्शक पद्मश्री श्याम बेनेगल यांना यंदाचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहिर झाला. मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि १० लाख रुपये असे स्वरूप असलेला हा पुरस्कार बेनेगल यांना मुंबई आंतरराष्ट्रीय …

Read More »

महारेराच्या विरोधात ग्राहकांना आता दाद मागता येणार महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणला अपिलावर सुणावनी घेण्याचे सरकारचे आदेश

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील बांधकाम व्यावसायिकांकडून ग्राहकांच्या होत असलेल्या फसवणूकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या गृहनिर्माण कायद्यातील तरतूदीनुसार महारेरा कायद्यांतर्गंत प्राधिकरणाची स्थापना केली. मात्र या प्राधिकरणाकडे स्वतःची न्यायप्रणाली नसल्याने सध्या महारेराच्या निकाला विरोधात दाद मागण्यासाठी महाराष्ट्र महसूल प्राधिकरणाकडे जबाबदारी सोपविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बांधकाम व्यावसायिकांवर जरब बसविण्यासाठी …

Read More »

ग्रामीण भागातील मुली-महिलांना ५ ते ३० रूपयात सॅनेटरी नॅपकिन मिळणार अस्मिता योजनेंतर्गत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या मुली आणि महिलांच्या आरोग्याच्यादृष्टीने महत्वाचे असलेले सॅनिटरी नॅपकिन माफक दरात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे या नॅपकिन अस्मिता योजनेंतर्गत ५ रूपयांपासून ते ३० रूपयांपर्यत महिला व मुलींना देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अस्मिता योजनेअंतर्गत स्वयंसहाय्यता समूहाव्दारे ग्रामीण …

Read More »

कर्जमाफीच्या योजनेपासून अद्यापही ५० लाखाहून अधिक शेतकरी वंचित राज्य सरकारची घोषणा फसवी असल्याचा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची घोषणा करत देशातील सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. मात्र मुख्यमंत्र्यांचा दावा पूर्णत: खोटा असून आजही ५० लाखापेक्षा अधिक शेतकरी कर्जमाफीपासून लांब असल्याचा आरोप कॉग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. राज्यातील कर्जमाफीत मंजूर झालेल्या ग्रीन यादीत ४७ लाख ४६ हजार २२२ शेतकऱ्यांचा समावेश असला …

Read More »

एलिफंटा बेट महावितरणच्या दिव्यांनी लवकरच उजळणार ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली पाहणी

मुंबई : प्रतिनिधी जागतिक वारसा लाभलेल्या भारतातील १७ सौंदर्य स्थळांपैकी एलिफंटा लेणी (घारापुरी बेट) येथे ७० वर्षात प्रथमच वीज पोहोचविण्यास ऊर्जा विभाग यशस्वी झाला आहे. त्यामुळे एलिफंटा बेट लवकरच वीजेच्या प्रकाशात उजळणार असून रात्रीही येथे पर्यटनाचा आनंद उचलता येणार आहे. महावितरणने या बेटावर वीज पोहोचविण्यासाठी केलेल्या कामाची पाहणी आज ऊर्जामंत्री …

Read More »

तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी १५ दिवसात मंडळ स्थापनार सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी समाजाच्या मुख्य प्रवाहात ज्या पध्दतीने स्त्री-पुरूषांना सन्मानाने जगता येते. त्याच पध्दतीने तृतीयपंथीयांनाही सन्माने जगता यावे याकरिता तृतीयपंथीयांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तृतीयपंथी कल्याण मंडळाची स्थापना करण्याची घोषणा सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज केली. राज्य सरकारने तृतीयपंथी व्यक्तींचा विकासासाठी प्रयत्नशील राहण्यासाठी स्वतंत्र कल्याण मंडळ …

Read More »