Breaking News

आणि राज्य सरकारची वेबसाईट क्रँश झाली लाखो नागरीकांची झाली निराशा

मुंबई : प्रतिनिधी

डिजीटल महाराष्ट्राचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यात महाराष्ट्र सरकारच्या संपूर्ण निर्णयाची माहिती पोचविणारे राज्य सरकारच्या मालकीचे महाराष्ट्र हे संकेतस्थळ क्रँश झाले. त्यामुळे राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती घेण्यासाठी संकेतस्थळावर धाव घेणाऱ्या लाखो नागरीकांची मोठी निराशा झाल्याने नागरींकामध्ये नाराजी निर्माण झाली.

राज्य सरकारच्या जवळपास ३६ विभागांसह नव्याने निर्माण झालेल्या आणखी ३ विभागांची माहिती सातत्याने या www.maharashtra.gov.in  संकेतस्थळावर अपलोड करण्यात येते. त्याचबरोबर या संकेतस्थळामध्येच राज्य सरकारच्या इतर विभागाच्या वेबसाईटची लिंक जोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे मुख्य संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यामुळे राज्य सरकारचे संकेतस्थळ सहसा बंद पडू नये अथवा क्रँश होवू नये यासाठी राज्य सरकाऱ्या आयटी विभागाकडून सतत प्रयत्न केले जातात. मात्र दुपारी २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास संकेतस्थळ ओपन होण्यास वेळ लागू लागला. त्यानंतर ही वेबसाईटच क्रँश झाल्याचा मेसेज संकेतस्थळावर येवू लागला.

ऑनलाईन पध्दतीने महसूल विभागाकडून नोंदणीचे काम सुरु होते. ते ही संकेतस्थळ कोसळल्याने महसूल विभागाचेही काम ठप्प झाले.

दरम्यान, आयटी विभागाचे प्रधान सचिव ई.व्ही.एस.श्रीनिवासन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.

 

Check Also

दक्षिण मुंबईत शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी

मुंबईतील असली नसली शिवसेनेवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूकीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *