Breaking News

ग्रामीण भागातील मुली-महिलांना ५ ते ३० रूपयात सॅनेटरी नॅपकिन मिळणार अस्मिता योजनेंतर्गत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी

राज्याच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या मुली आणि महिलांच्या आरोग्याच्यादृष्टीने महत्वाचे असलेले सॅनिटरी नॅपकिन माफक दरात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे या नॅपकिन अस्मिता योजनेंतर्गत ५ रूपयांपासून ते ३० रूपयांपर्यत महिला व मुलींना देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

अस्मिता योजनेअंतर्गत स्वयंसहाय्यता समूहाव्दारे ग्रामीण भागात महिलांना अस्मिता या ब्रँड नावाने २४० मी.मी., Trifold, winged आठ सॅनेटरी नॅपकिन्स २४ रुपये प्रती पॅकेट आणि २८० मी.मी., Trifold, winged आठ सॅनेटरी नॅपकिन्स २९ रुपये प्रती पॅकेट याप्रमाणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ११ ते १९ या वयोगटातील मुलींना रुपये प्रति पॅकेट या सवलतीच्या दराने सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच या योजनेंतर्गत सॅनिटरी नॅपकिन्सची मागणी नोंदविण्यासाठी व पुरवठा करण्यासाठी विशिष्ट ॲप तयार करण्यात येणार आहे. ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेच्या अंमलबजावणीकरीता नोडल एजन्सी म्हणून उमेद (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान) तर कुटुंब कल्याण विभागाचे अतिरिक्त संचालक हे नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

मासिक पाळीच्या काळात योग्य ती काळजी न घेतल्याने महिला आणि मुलींमध्ये प्रजननाशी निगडीत अनेक समस्या निर्माण झाल्याचे ग्रामीण भागात घेण्यात आलेल्या आरोग्यविषयक सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे. तसेच ११ ते १९ वयोगटातील किशोरवयीन मुली सर्वसाधारणपणे वर्षातील ५० ते ६० दिवस मासिक पाळीच्या काळात शाळांमध्ये अनुपस्थित राहण्याचे प्रमाण वाढले आहे. हे टाळण्यासाठी ग्रामीण भागातील महिला व किशोरवयीन मुलींच्या आरोग्याच्या काळजीबाबत जनजागृतीची गरज ओळखून ही योजना राबविण्यात येणार आहे.

योजनेंतर्गत उमेदपुरस्कृत स्वयंसहाय्यता समुहांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना व किशोरवयीन मुलींना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन्सचा पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच या समूहांच्या माध्यमातुन आरोग्य व वैयक्तिक स्वच्छतेशी संबंधितमाहिती, शिक्षण आणि जनसंवाद IEC (Information, Education and Communication) विषयक साहित्य तयार करणे व विविध बैठकांमार्फत महिलामुलींमध्ये याबाबत प्रसार करण्यात येणार आहे.

 

Check Also

Corona जे एन- १ ला घाबरू नका, सतर्क रहा

राज्यात कोरोनाच्या Corona ‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळले असले, तरी नागरिकांनी घाबरून न जाता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *