Breaking News

Tag Archives: home minister

राज ठाकरे-अमित शाह भेट होणार का? फडणवीस यांनी दिले ‘हे’ संकेत आयत्या वेळी होवू शकते भेट

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या मदतीने उलथवून टाकल्यानंतर भाजपा नेत्यांकडून सातत्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेण्याचा सपाटा सुरु आहे. त्यातच गणेशोत्सवानिमित्त तर २४ तासाच भाजपाच्या तीन नेत्यांनी राज ठाकरे यांच्या घरी भेटी दिल्या. त्यानंतर मुख्यमंत्री …

Read More »

शरद पवार म्हणाले, जेथे सत्ता नाही तेथे सत्तेपासून दूर करणे हाच उपक्रम… केंद्रीय यंत्रणाच्या गैरवापरावरून साधला निशाणा

देशातील विविध राज्यांमधील राजकिय नेत्यांच्या विरोधात सध्या कधी सीबीआयकडून तर कधी ईडीकडून तर कधी आयकर विभागाकडून धाडी टाकण्याचे काम केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की, राजकीय नेतृत्वाने सतत काहीना काही कारणातून कुणावर …

Read More »

अमित शाह यांची मोठी घोषणा, लसीकरण मोहिम संपताच सीएए कायदा लागू मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे विरोधक सुवेंदू अधिकारी यांची माहिती

भारताचे नागरीक असल्याचे सिध्द करण्यासाठी देशात नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएए कायदा लागू करण्यावरून काही वर्षापूर्वी मोठा गदारोळ उडाला होता. मात्र आता पुन्हा एकदा हा कायदा लागू करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठे विधान केले असून देशात लसीकरण मोहिम संपताच नागरिकत्व लागू करणार असल्याचे जाहिर केले. पश्चिम बंगाल मधील …

Read More »

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची घोषणा, ७२३१ पदांसाठी पोलीस शिपाई भरती पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार-गृहविभागाची अधिसूचना जारी

दिलीप वळसे पाटील

शासनाने राज्यात सन २०२० ची पोलीस शिपाई संवर्गातील ७२३१ रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिलीप …

Read More »

एकनाथ शिंदे यांच्या आरोपाला गृहमंत्री दिलीप वळसेंचे प्रत्युत्तर आमदारांची सुरक्षा काढली नाही

शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटात समाविष्ट झालेल्या आमदारांची सुरक्षा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी काढून घेतल्याचा आरोप केला. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी तात्काळ प्रत्युत्तर देत अशी कोणतीही कृती करण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले. आज एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरून एक पत्र ट्विट करत …

Read More »

गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिला कायदा व सुव्यवस्थेचा विधानसभेत लेखोजागा बलात्काराच्या गुन्ह्यांचा तपास दोन महिन्यात करण्याचे आता बंधन

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरून भाजपाकडून सातत्याने महिलांच्या सुरक्षे्या प्रश्नावरून आणि वाढत्या बलात्काराच्या गुन्ह्यांवरून महाविकास आघाडीला धारेवर धरण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी राज्यातील गुन्ह्यांची माहिती सादर करत बलात्काराच्या गुन्ह्यांचा तपास दोन महिन्याच्या आता तपास करणे चौकशी अधिका-यांवर बंधनकारक करण्यात आल्याचे विधानसभेत सांगितले. हिवाळी अधिवेशनाला …

Read More »

ट्विट करणाऱ्या “त्या” सेलिब्रिटींची आयबी चौकशी करणार काँग्रेसची पक्षाच्या मागणीवर गृहमंत्र्यांचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटला भारतीय सेलिब्रिटींनी दिलेल्या प्रत्युतरामागे भारतीय जनता पक्षाने त्यांना प्रवृत्त केले होते का? व भाजपाचा त्यांच्यावर कोणता दबाव होता का? देशपातळीवरती अनेक संवैधानिक संस्था, विरोधी पक्षांची सरकारे व मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या व्यक्तींवर मोदी सरकारचा प्रचंड मोठा विरोध असताना या राष्ट्रीय हिरोंच्या मागे …

Read More »

वाधवानप्रकरणातील वादग्रस्त अधिकारी अमिताभ गुप्तांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थलांतरीत कामगार, विद्यार्थी आणि यात्रेकरूंना पाठविण्याऱ्या समितीचे प्रमुख

मुंबई: विशेष प्रतिनिधी लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात येस बँकेतील घोटाळ्याप्रकरणातील आरोपी एचडीआयएलचे प्रमुख वाधवान यांना खास पत्र देत महाबळेश्वरला जाण्याची परवानगी देण्याचे पत्र देत संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले आयपीएस अधिकारीअमिताभ गुप्ता यांनाच आता राज्य सरकारने पुन्हा एका समितीचे प्रमुख पद दिले. विशेष म्हणजे राज्यातील स्थलांतरीत कामगार, विद्यार्थी आणि यात्रेकरून त्यांच्या मूळ गावी …

Read More »

याद राखा…अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न कराल तर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा समाजमाध्यमकर्त्यांना इशारा

मुंबई: प्रतिनिधी काही विघ्नसंतोषी लोक समाज माध्यमांचा दुरुपयोग करून सामाजिक व धार्मिक तेढ, दुही निर्माण करण्याचा, समाजात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र सायबर विभाग लक्ष ठेवून आहे. जर असे काही कराल तर कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी समाजकंटकांना दिला असून अशा व्यक्तींवर …

Read More »

महाराष्ट्रातही बलात्कार, लैगिंक छळ आदींच्या गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा अर्थसंकल्पीय अधिवेशनातच नवा कायदा मांडणार असल्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई: विशेष प्रतिनिधी महिलांवरील अत्याचारांच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारच्या ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात नवीन कायदा तयार करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत हा कायदा बनविण्यासाठी विधेयक विधिमंडळात मांडण्यात येणार असून या कायद्याअंतर्गत बलात्कार, सामुहिक बलात्कार, अल्पवयीन बालकांवरील अत्याचारासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सांगितले. विधान …

Read More »