Breaking News

Tag Archives: enforcement directorate

राज्यसभा निवडणूक; न्यायालयाने मलिक, देशमुखांच्याबाबत दिला “हा” निर्णय मतदानासाठी जामीन देण्यास नकार

राज्यसभा निवडणूकीसाठी एक दिवसाचा जामीन अर्ज मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान मंत्री नवाब मलिक यांनी विशेष न्यायालयात अर्ज केला. मात्र काल ईडीने या दोघांना जामीन देण्यास विरोध केल्यानंतर ईडीने केलेल्या युक्तीवादानुसार आज एक दिवसाचा जामीन देण्यास विशेष न्यायालयाने नकार देत न्यायाधीश आर.एन. रोकडे यांनी नवाब …

Read More »

राज्यसभा निवडणूकः ईडी म्हणते, कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही न्यायालयाकडून अंतिम निर्णयाची अपेक्षा

राज्यसभा निवडणूकीत मतदान करता यासाठी माजी मंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांनी तात्पुरता जामिन मिळावा याकरीता न्यायालयात अर्ज दाखल केला. तसेच मतदान करण्यासाठी एक दिवसाचा तात्पुरता जामीन मिळावा अशी मागणीही केली. त्यावरील आज झालेल्या सुनावणी दरम्यान सक्तवसुली संचनालय अर्थात ईडीने विरोध केला. त्यामुळे या दोघांच्या जामीन अर्जावर न्यायालयाने …

Read More »

वारंवार धाडी टाकण्यापेक्षा काँग्रेस नेत्यांच्या घराबाहेर सीबीआय, ईडीचे तंबूच ठोका काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची टीका

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे सुपुत्र कार्ती चिदंबरम यांच्या घरावर सीबीआयने पुन्हा एकदा धाड टाकली. काँग्रेस नेत्यांच्या घरावर सातत्याने धाडी टाकल्या जात आहेत हे दुर्दैवी आहे. तपास यंत्रणांना निर्देश देऊन वारंवार धाडी टाकण्यापेक्षा मोदी सरकारने काँग्रेस नेत्यांच्या घराबाहेरच कायमस्वरुपी सीबीआय, ईडीच्या पथकाचे तंबूच तैनात करावेत …

Read More »

नवाब मलिक यांना अखेर न्यायालयाने दिली “या” गोष्टीसाठी परवानगी खाजगी रूग्णालयात उपचार करून घेण्यास परवानगी दिली

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी संबधित व्यक्तींशी आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी सध्या ईडीच्या तुरुंगात असलेले राज्य मंत्रिमंडळातील मंत्री नवाब मलिक हे काही दिवसांपासून आजारी आहेत. तसेच वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्याची मागणी करत खाजगी रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यास परवानगी द्यावी अशी विनंती करणारी याचिका त्यांनी विशेष न्यायालयात केली. अखेर विशेष न्यायालयात यासंदर्भात आज सुनावणी …

Read More »

देवेंद्र फडणवीसांचा पलटवार, एजन्सी कुणाचे नातेवाईक बघून कारवाई करत नसते मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या उत्तरावर फडणवीसांचे प्रत्युत्तर

केंद्रीय एजन्सींकडून शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई केल्यानंतर विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी भाजपा आणि फडणवीसांवर हल्लाबोल करत माझ्या कुटंबियांची कशाला बदनामी करता, तुम्हाला आरोप करायचेत तर माझ्यावर करा आणि मला अटक करा मी येतो तुमच्यासोबत टाका मला तुरुंगात असे आव्हान दिले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या …

Read More »

संजय राऊत म्हणाले, त्यांची लाकडं रचली श्रीधर पाटणकरांवरील कारवाईवर संजय राऊतांची भाजपावर टीका

मुखमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची टीका केली जात आहे. शरद पवार, जितेंद्र आव्हाड, नाना पटोले, आदित्य ठाकरे अशा अनेक नेत्यांनी भाजपावर टीका केली. त्यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी या कारवाईवरून भाजपावर …

Read More »

आव्हाडांचे ते वक्तव्य म्हणजे महाराष्ट्र द्रोहच भाजपा आमदार आशिष शेलार यांची टीका

राज्यात ईडीने थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत पुष्पक ग्रुपची संबधित साईबाबा कंपनीची मालमत्ता जप्त केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माझ्या मुलीला इथे महाराष्टात ठेवणार नाही आणि मुलीला इथे नुसतं बोलावले तरी ती आत्महत्या करेल असे वक्तव्य केले. …

Read More »

ईडीच्या कारवाईवर संजय राऊत म्हणाले, ही तर राक्षसी हुकूमशाहीची नांदी न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा नाही

राज्यातील महाविकास आघाडीशी संबधित मंत्री, आमदार यांच्यावर केलेल्या कारवाईनंतर आता ईडीने थेट राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला आहे. तसेच या कारवाईत ६ कोटी ४५ लाख रूपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचे ईडीने जाहीर केले. ईडीने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नातेवाईकावरच थेट …

Read More »

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक जे.जे.रूग्णालयात दाखल ३ मार्चपर्यत ईडी कोठडी सुणावली होती

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम हिची बहीण हसीना पारकर हिच्याशी असलेल्या आर्थिंक सबंध आणि जमिन खरेदी करताना मनी लॉंडरींग केल्याचा ठपका ठेवत ईडीने राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अटक केली. सध्या न्यायालयाने त्यांना ३ मार्च पर्यत ईडी कोठडी सुणावली आहे. मात्र आज सकाळी त्यांची तब्येत अचानक …

Read More »

मलिकांना मंत्रिमंडळातून काढण्याचा ‘ठाकरी बाणा’ मुख्यमंत्री दाखवणार का? भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा सवाल

बॉम्बस्फोट करून शेकडो मुंबईकरांचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याचा हस्तक असलेल्या नवाब मलिक यांना सत्तेच्या लाचारीसाठी मंत्रीपदावर ठेवणे हा  महाराष्ट्राचा अपमान असून उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापुढे न झुकता मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून ठाकरी बाणा दाखवणार का, असा सवाल भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत …

Read More »