Breaking News

Tag Archives: enforcement directorate

मलिकांच्या अटकेवर चंद्रकांत पाटील म्हणाले, आता नवाब मलिकांनी… ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप झाले त्यांनी राजीनामे दिले

पहाटेच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या घरी पोहचत त्यांच्या घराची झडती घेत मलिक यांना ताब्यात घेवून ईडी कार्यालयात आणले. त्यानंतर तब्बल आठ तास ईडीने चौकशी करून नवाब मलिक यांना अटक केली. त्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खोचक प्रतिक्रिया व्यक्त करत, आता मलिकांनी नैतिकतेला धरून राजीनामा द्यायला हवा अशी मागणी …

Read More »

अटकेनंतर न्यायालयात ईडी आणि नवाब मलिकांकडून कोणता केला युक्तीवाद? वाचा ईडी म्हणते नवाब मलिकांचा संबध डी गँगच्या सात मालमत्तांशी

राज्याचे मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने आठ तासाच्या चौकशीनंतर अटक केली. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ईडीने मलिक यांना दिवाणी न्यायालयात हजर केले. त्यावेळी ईडीकडून नवाब मलिक यांना १४ दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली. यावेळी ईडीने मलिक यांच्यावर आरोप करताना म्हणाले की, दाऊद हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी …

Read More »

सकाळी ७.३० वाजल्यापासून चौकशी, दुपारी ३ च्या सुमारास मंत्री मलिकांना ईडीकडून अटक पहाटे ४ वाजता ईडीचे अधिकारी मलिकांच्या घरी पोहोचले

मागील काही दिवसांपासून भाजपा नेते सातत्याने महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री ईडीच्या कोठडीत जाण्याच्या रांगेत असल्याचे सांगत होते. तसेच ईडीची कारवाई लवकरच होणार असल्याचा इशाराही देत होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या कुर्ला येथील निवासस्थानी ईडीचे अधिकारी पोहचत मलिक यांना ईडी कार्यालयात येण्यास सांगितले. त्यानंतर …

Read More »

भ्रष्टाचाराची चौकशी करायचीय तर सुरुवात नितीन गडकरींपासून करा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याच्या कटात सहभागी न झाल्याने मला आणि माझ्या कुटुंबियांना त्रास देण्यासाठी आपल्यामागे ईडीचा ससेमिरा लावल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी करत केंद्रीय संस्थांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही निशाणा साधला. याच टीकेचा धागा …

Read More »

हा तर खा.राऊत यांचा कांगावा भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी ईडी ने पाठवलेल्या नोटिशीबाबत शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी घेतलेली पत्रकार परिषद म्हणजे निव्वळ कांगावा होता. ईडी ने चुकीच्या पद्धतीने नोटीस पाठवली असं वाटत असेल तर खा.राऊत यांनी ईडी विरोधात खुशाल न्यायालयात जावे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केले. खा.राऊत यांची पत्रकार परिषद …

Read More »

तुमची ईडी असो वा काही तिला ‘येडी’ केल्याशिवाय गप्प बसणार नाही चितपट कुस्ती खेळणाऱ्या पैलवानांची फळी तयार केलीय- शरद पवारांचा टोला

पंढरपूरः प्रतिनिधी ज्यांच्या हाती सत्ता आहे ते सत्तेचा गैरवापर करताना दिसतात. त्यांच्याविरोधी कोणी बोलले तर तो देशद्रोही ठरवला जातो. आजचे राज्यकर्ते गुन्हेगारांवर कारवाई न करता त्यांच्या विरोधात जो बोलतो त्यावर ईडीचं हत्यार वापरतात. आता तुमची ईडी असो वा काही तिला ‘येडी’ केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा स्पष्ट इशाराही शरद पवार …

Read More »

पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार, ईडी कार्यालयात जाणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील कार्यालयात स्वत:च उपस्थित राहणार असल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले होते. त्यानंतर खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांकंडून कुलाबा, कफ परेड, मरीन ड्राइव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जे. जे. मार्ग, एमआरए मार्ग या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश दिले होते. याव्यतिरिक्त अनेक …

Read More »

“ईडी” ने ( पवार ) “पीडा” सध्यातरी टाळली सध्या येण्याची गरज नसल्याचे ईडीने कळविल्याची राष्ट्रवादीची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्य शिखर बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या विरोधात ईडी (सक्तवसुली संचालनालय) कार्यालयाने गुन्हा दाखल केला. या गुन्हा नोंदण्याची माहिती मिळताच शरद पवार हे स्वतः आज २७ सप्टेंबरला दुपारी त्यांच्या कार्यालयात जाणार होते. परंतु पवार पोहोचण्यापूर्वीच ईडी कार्यालयाकडून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची गरज नसल्याचा ईमेल …

Read More »

मोदी – शहा, फडणवीस यांच्या नावाने शिमगा राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे ईडीच्या कार्यालयात हजर होणार असल्याने पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून जागोजागी ईडीच्या कार्यालयाकडे येणाऱ्या लोकांची कसून चौकशी आणि तपासणी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयासमोर कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने जमा झाले असून मोदी- शहा आणि फडणवीस यांच्या नावाने शिमगा …

Read More »