Breaking News

सकाळी ७.३० वाजल्यापासून चौकशी, दुपारी ३ च्या सुमारास मंत्री मलिकांना ईडीकडून अटक पहाटे ४ वाजता ईडीचे अधिकारी मलिकांच्या घरी पोहोचले

मागील काही दिवसांपासून भाजपा नेते सातत्याने महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री ईडीच्या कोठडीत जाण्याच्या रांगेत असल्याचे सांगत होते. तसेच ईडीची कारवाई लवकरच होणार असल्याचा इशाराही देत होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या कुर्ला येथील निवासस्थानी ईडीचे अधिकारी पोहचत मलिक यांना ईडी कार्यालयात येण्यास सांगितले. त्यानंतर मलिक हे ईडी कार्यालयात पोहोचल्यानंतर त्यांची दुपारी ३ वाजेपर्यत चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

नवाब मलिक यांनी स्वत:हून ईडी कार्यालयात हजर होणार म्हणून ईडी अधिकाऱ्यांना पहाटे सांगितल्यानंतर सकाळी ७.३० च्या सुमारास ते स्वत:हून ईडी कार्यालयात पोहोचले. त्यानंतर मलिक यांची सकाळी सुरु झालेली चौकशी दुपारी ३ वाजत आले तरी सुरुच होती. त्यानंतर मलिक यांना ईडीने अटक करत त्यांना ईडी न्यायालयासमोर हजर केले.

मलिक यांच्या घरी ईडीचे अधिकारी पोहचल्याचे वृत्त वाऱ्यासारखे मुंबईत पसरले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्ये हळूहळू मलिक यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर संबध मुंबईतून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्ये बॅलार्ड पिअर्स येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाजवळ पोहोचले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाजवळ कार्यकर्त्ये पोहोचल्यानंतर ईडी कार्यालयाजवळील बंदोबस्त वाढविण्यात आला. त्यासाठी सीआरपीएफच्या जवानांना ईडीने पाचारण करत बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले. तसेच कार्यालयाच्या जवळपासही या जवानांनी कोणास फिरकू देण्यास मनाई केली. परंतु ईडीने मलिक यांना अटक केल्यानंतर कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर एकदम गर्दी करत मलिक यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

अटकेनंतर मलिक यांना वैद्यकीय तपासणीसाठी ईडीचे अधिकारी कार्यालयातून नवाब मलिक यांना बाहेर घेवून आल्यानंतर मलिक यांनी जिंदाबाद घोषणेप्रमाणे एका हाताची मुठी हवेत उचलून दाखवित त्यांनी सुहास्य वदनाने ते ईडीच्या गाडीत बसले.

दरम्यान ईडीच्या या कारवाईमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबरोबरच काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपावर टीका केली. तर भाजपाच्या नेत्यांकडून मलिक यांनी जर काहीही केलेले नसेल तर त्यांना घाबरण्याचे कारण नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *