Breaking News

“ईडी” ने ( पवार ) “पीडा” सध्यातरी टाळली सध्या येण्याची गरज नसल्याचे ईडीने कळविल्याची राष्ट्रवादीची माहिती

मुंबईः प्रतिनिधी
राज्य शिखर बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या विरोधात ईडी (सक्तवसुली संचालनालय) कार्यालयाने गुन्हा दाखल केला. या गुन्हा नोंदण्याची माहिती मिळताच शरद पवार हे स्वतः आज २७ सप्टेंबरला दुपारी त्यांच्या कार्यालयात जाणार होते. परंतु पवार पोहोचण्यापूर्वीच ईडी कार्यालयाकडून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची गरज नसल्याचा ईमेल पवारांना पाठवित येऊ नका असे सांगितल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्त नवाब मलिक यांनी दिली. त्यामुळे ईडीने पवार पीडा सध्यातरी टाळल्याचे राजकिय वर्तुळात बोलले जात आहे.
ईडीने गुन्हा नोंदविल्याची माहिती शरद पवार यांनी २५ सप्टेंबर २०१९ पत्रकार परिषद घेत ईडी कार्यालयात आपण स्वतः चौकशीसाठी जाणार असल्याचे जाहीर केले. तसेच याप्रकरणात त्यांना जे सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार आज सकाळपासून शरद पवार हे ईडी कार्यालयात जाण्यासाठी तयारी करत होते. तत्पूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्त्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर जमू लागले. तसेच त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही सुरु केली. त्यामुळे मुंबईतील बॅलार्ड पिअर परिसरात जमावबंदीचे आदेश पोलिसांनी लागू केले.
शरद पवार हे ईडी कार्यालयात जाणार असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून मुंबई पोलिसचे कायदा व सुव्यवस्था आयुक्त चौबे हे पवारांची भेट घेवून त्यांना परिस्थितीची कल्पना दिली. तरीही पवार हे आपल्या जाण्यावर ठाम राहील्याने मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी पवारांची भेट घेत त्यांच्या जाण्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तविली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा करून अखेर पवार यांनी ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला.

राज्याच्या राजकारणा शरद पवार यांच्या इतका पॉवरफूल नेता दुसऱा असल्याचे दिसत नाही. त्यातच ते जेव्हा एखाद्याच्या मागे लागतात तेव्हा तो राजकारणातून संपला जातो असे नेहमी सांगितले जाते. याची कबुली त्यांनी स्वतः सोलापूरातील जाहीर सभेत बोलताना देत पुलोद सोडून जे गेले त्यातील अनेकजण पुन्हा विधानसभेत दिसले नसल्याचे त्यांनी सांगितले. आता दस्तुरखुद्द सक्तवसुली संचानलयाने त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला. त्याची केवळ माहिती मिळताच पवार यांनी स्वतःच चौकशीला जाण्याचा निर्णय घेतल्याने आता ईडीचे काही खरे नाही अशी चर्चा सर्वचस्तरात सुरु झाली. मात्र आता ईडीनेच त्यांना सध्यातरी येवू नका असे कळविल्याने ईडीने पीडा टाळल्याचे बोलले जात आहे.

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, हेमंत करकरे यांची हत्या कसाबने नव्हे तर आरएसएसच्या…

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) माजी प्रमुख हेमंत करकरे यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *