Breaking News

नवाब मलिक यांना अखेर न्यायालयाने दिली “या” गोष्टीसाठी परवानगी खाजगी रूग्णालयात उपचार करून घेण्यास परवानगी दिली

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी संबधित व्यक्तींशी आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी सध्या ईडीच्या तुरुंगात असलेले राज्य मंत्रिमंडळातील मंत्री नवाब मलिक हे काही दिवसांपासून आजारी आहेत. तसेच वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्याची मागणी करत खाजगी रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यास परवानगी द्यावी अशी विनंती करणारी याचिका त्यांनी विशेष न्यायालयात केली. अखेर विशेष न्यायालयात यासंदर्भात आज सुनावणी झाली. त्यानंतर नवाब मलिक यांना खाजगी रूग्णालयात उपचार करण्यास परवानगी दिली. त्यामुळे मलिक यांना दिलासा मिळाला आहे.
मलिक यांची प्रकृती बिघडल्याने नवाब मलिक यांना काही दिवसांपूर्वी जे. जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच त्यांच्यावर काही उपचारही सुरु करण्यात आले होते. मात्र ईडीने हरकत घेतल्याने त्यांना जे.जे.रूग्णालयातून जबरदस्तीने डिस्चार्ज देण्यात आला. याबाबत त्यांनी न्यायालयात आणि ईडीकडेही त्यांनी विरोध दर्शविला.
प्रकृती ठीक नसल्याने नवाब मलिक यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली. मात्र न्यायालयाने त्यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास नकार दिला. मुंबईत कुर्ला येथील क्रिटीकेअर रुग्णालयात नवाब मलिक यांना उपचार घेण्यासाठी सत्र न्यायालयाने परवानगी दिली आहे. परिवारातील एका व्यक्तीला मलिकांसोबत उपचारादरम्यान उपस्थित राहण्यास न्यायालयाने मुभा दिली आहे. उपचांरासह पोलीस बंदोबस्ताचा खर्च देखील नवाब मलिक यांनाच करावा लागणार आहे.
नवाब मलिकांना वैद्यकीय जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. जामीन अर्जात नवाब मलिक यांना कोर्टाला किडनीच्या आजारांमुळे प्रकृती ठीक नसून पायांना सूज असल्याचं सांगितले होते. त्याच वेळी खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी परवानगी देण्याचीही मागणी केली होती.
नवाब मलिक यांचे वकील कुशल यांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबीय घरचं जेवण देण्यासाठी जेलमध्ये गेले असता त्यांची प्रकृती ढासळली असल्याचे समोर आले होते. नवाब मलिक खूप आजारी असल्याचे सांगत कुशल यांनी कोर्टाकडे त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली होती.
परंतु मलिक यांच्या अर्जाला ईडीने हरकत घेत नवाब मलिक यांच्यावरील उपचारासाठी सर्वोत चांगल्या अशा सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना खाजगी रूग्णालयत दाखल करण्याची आवश्यकता नाही असे न्यायालयात सांगितले. मात्र न्यायालयाने ईडीचे म्हणणे फेटाळून लावत मलिक यांना खाजगी रूग्णालयात उपचार करून घेण्यास परवानगी दिली.

Check Also

महाराष्ट्र लोकसेवा आयोग लवकरच ‘या’ परिक्षांच्या तारखा जाहीर करणार

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून लवकरच सुधारित परिक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *