Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

बातमीचा फलक मुख्यमंत्र्यांसमोर फडकाविल्याने भाजपा-शिवसेनेच्या आमदारात धक्काबुक्की विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची सत्ताधारी-विरोधकांना समज

नागपूरः विशेष प्रतिनिधी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मुद्यावरून भाजपाने आज दुसऱ्या दिवशीही आक्रमक पवित्रा घेतला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई २५ हजाराची द्यावी अशी मागणी करत होते. यावेळी भाजपाचे औसाचे आमदार अभिमन्यू पवार हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समोरील मोकळ्याजागेत बातमीचा फलक फडकाविण्याचा प्रयत्नास शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड, …

Read More »

शिवस्मारकातील भ्रष्टाचाराच्या चौकशीचे स्वागत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचे प्रतिपादन

मुंबईः प्रतिनिधी गेल्या पाच वर्षात भाजपाच्या सरकारने प्रचंड घोटाळे केले. त्या सर्व घोटाळ्यांना क्लीन चिट दिली. परंतु त्यातही ज्या शिवरायांचे नाव घेऊन भाजप सत्तेवर आली त्यांच्या स्मारकातही भ्रष्टाचार करण्याचे प्रचंड मोठे पातक भाजपने केल्याचे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने उघडकीस आणलेल्या शिवस्मारक घोटाळ्यातील आरोपांना कॅगने अधोरेखीत केले. या घोटाळ्याची मुख्यमंत्री उद्धव …

Read More »

विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर यांची निवड सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून घोषणा

नागपूर: प्रतिनिधी विधानपरिषदेच्या सभागृह नेतेपदी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची तर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर यांनी निवड झाल्याची घोषणा विधान परिषदेचे सभापती नाईक निंबाळकर यांनी आज केली. सभागृह नेतेपदी देसाई व विरोधी पक्षनेते पदी दरेकर यांची निवड झाल्याबद्दल सभापती नाईक निंबाळकर यांनी दोघांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे …

Read More »

स्वा. सावरकरांचा विषय रेकॉर्डवर नको म्हणताच भाजपाचा गोंधळ विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी घेतली हरकत

नागपूरः प्रतिनिधी विधानसभेत कलम २३ आणि ५७ अन्वये कामकाज बाजूला ठेवत स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत चर्चेस सुरुवात केली. मात्र अध्यक्ष नाना पटोले यांनी हे रेकॉर्डवर घ्यायचे नाही असे सांगताच भाजपाच्या सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या गोंधळाच सभागृहाचे …

Read More »

उल्हासनगरच्या महिलेकडून मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न पतीला गुन्ह्यातून सोडविण्यासाठी पत्नीचा पराक्रम

मुंबईः प्रतिनिधी शासकिय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी सध्या शिक्षा भोगत असलेल्या पतीच्या सोडवणूकीसाठी उल्हासनगर येथील एका महिलेने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र मंत्रालयात लावलेल्या संरक्षण जाळीमुळे सदर महिला बचावली. उल्हासनगर येथील रहिवाशी असलेली प्रियंका अजय गुप्ता असे या महिलेचे नाव असून तीच्या पतीवर आयपीसी ३५३ अन्वये गुन्हा …

Read More »

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ७ मंत्र्यांना तात्पुरते खात्यांचे वाटप मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सत्तास्थानी विराजमान झाल्यानंतर तब्बल १४ दिवसांनी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना तात्पुरते खात्यांचे वाटप करण्यात आले. मंत्र्यांना खातेवाटपाची यादी मंजूरीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकेड पाठविण्यात आली होती. त्यांच्या मंजूरीनंतर यासंदर्भातील अधिकृत घोषणा राज्य सरकारच्यावतीने करण्यात आली. या खाते वाटपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सांसदीय राजकारणात …

Read More »

शिवछत्रपतींच्या मार्गावरच हा महाराष्ट्र पुढे जाईल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन

पुणे: प्रतिनिधी सामान्य रयतेच्या कल्याणासाठी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. दीन, दलित, आदिवासी, शोषित, शेतकरी, शेतमजूर, महिलांच्या कल्याणाची प्रेरणा शिवछत्रपतींच्या कार्यातूनच आम्हाला मिळाली असून त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच महाराष्ट्राचा कारभार चालेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केला. किल्ले शिवनेरी (ता. जुन्नर) येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती …

Read More »

मराठी ई-बातम्या.कॉमच्या वृत्ताची दखल घेत मुख्यमंत्री ठाकरेंचे केंद्राला पत्र जीएसटी मोबदला आणि कर परताव्याची रक्कम मिळण्याबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती

मुंबई: विशेष प्रतिनिधी वस्तू व सेवा कर (जीएसटी) मोबदला आणि कर परताव्याची रक्कम राज्याला लवकरात लवकर मिळावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना पत्रान्वये केली. यांसदर्भातील वृत्त मराठी ई-बातम्या.कॉम या संकेतस्थळाने ६ डिसेंबर २०१९ रोजी प्रसारीत केले होते. या वृत्ताची दखल घेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे …

Read More »

देवेंद्र पाठोपाठ उध्दव यांचाही भूषण गगराणी यांच्यावर विश्वास गगराणी आणि विकास खरगे बनले मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव

मुंबईः प्रतिनिधी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अधिकारी भूषण गगराणी यांना एमआयडीसीच्या मुख्याधिकारी पदावरून थेट मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव म्हणून साधारणतः एक वर्षभरापूर्वी नियुक्त केले. आता माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापाठोपाठ विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही त्यांची मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती कायम ठेवल्याने एकाच अधिकाऱ्यावर आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी …

Read More »

जून्यांचे अनेक कर्मचारी-अधिकारी नव्या मंत्र्यांच्या प्रतिक्षेत २०० हून अधिकजण आजारपणाच्या सुट्टीवर

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील मंत्र्याकडे आणि त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या शिपायांना नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे वेध लागलेले आहे. त्यामुळे जून्या मंत्र्यांच्या कडच्या अनुभवाचा फायदा नव्या मंत्र्याकडे करून घेण्यासाठी या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मूळ विभागात रूजू होण्याऐवजी आजारपणाच्या सुट्टीवर जाणे पसंत केल्याची माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. गतवेळच्या राज्य मंत्रिमंडळातील बहुतांष मंत्र्यांकडे विशेष …

Read More »