Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बीआयटी चाळीतील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक बनविणार महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परळ दामोदर हॉलजवळील बीआयटी चाळ येथील इमारतीत दुसऱ्या माळ्यावर राहायचे. 1912 ते 1934 या 22 वर्षे कालावधीत त्यांचे येथे वास्तव्य होते. हे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमी दादर येथे केली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63व्या …

Read More »

आर्थिंक मंदीमुळे केंद्राने थकविले महाराष्ट्राचे १२ हजार कोटी रूपये स्टेट जीएसटी विभागाकडून केंद्राला पत्र

मुंबईः विशेष प्रतिनिधी देशाचा आर्थिक स्थिती कितीही चांगली असल्याचा डामढोल केंद्रातील भाजपा सरकारकडून बडविण्यात येत आहे. मात्र वास्तविक परिस्थितीत केंद्र सरकारकडे पुरेसा निधीच शिल्लक नसल्याने महाराष्ट्राच्या हिश्शाला येणारे १२ हजार कोटी रूपये पाच महिने होत आले तरी अद्याप दिले नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. केंद्र सरकारने करातून महसूली उत्पन्न …

Read More »

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरही उद्धव ठाकरेंना चैत्यभूमीवर जाण्यास वेळच नाही भाजपा नेते आ. भाई गिरकर यांची खंत

मुंबईः प्रतिनिधी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे हे चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यास गेले नाहीत. तसेच महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीसाठी त्यांनी राज्याचे प्रमुख म्हणून स्वतः बैठकही घेतली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यास ते गेले नसल्याची खंत व्यक्त करत त्यांचे डॉ.बाबासाहेबांविषयीचे प्रेम बेगडी असल्याची टीका भाजपा नेते …

Read More »

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी ६० हजार कोटी रूपये? सहकार आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या

मुंबईः विशेष प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणी केली होती. मात्र कर्जमाफीसाठी ६० हजार कोटी रूपयांचा आकडा सहकार विभागाने पुढे केल्याने महाविकास आघाडी सरकार अवाक झाले असून नेमकी वास्तविक आकडेवारी सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कृषी व …

Read More »

भीमा कोरेगाव, इंदू मिल आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या पीपल्स रिपाईचे जोगेंद्र कवाडे, राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी भीमा कोरेगाव व इंदू मिल आंदोलनातील आंबेडकरी कार्यकर्ते व युवकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये आणि पीपल्प रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनामार्फत केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते …

Read More »

मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या ६ मजल्यावर फक्त मुख्यमंत्रीच पवार, खडसे, डॉ.बोंडेमुळे मविआचे मंत्री म्हणतात ६ मजला नको

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात नव्याने स्थापन झालेल्या राज्य मंत्रिमंडळात सध्या ७ मंत्र्यांची निवड करण्यात आली. या मंत्र्यांना कोणती दालने मिळणार याबाबत उस्तुकता निर्माण झाली होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या दालनाशेजारी असलेल्या दालनात कोणताच मंत्री बसण्यास तयार नसल्याने सध्यातरी ६ व्या मजल्यावर फक्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे दालन राहणार आहे. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीला …

Read More »

म्हाडाच्या संक्रमण शिबीरातील घरांचे लाईटबील भाडेकरूंच्या नावावर होणार म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई: प्रतिनिधी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील गाळ्यांमधील विद्युत मीटर उपअभियंता किंवा मिळकत व्यवस्थापक यांच्या नावे न घेता संबंधीत पात्र गाळेधारकाच्या नावे घेण्यात यावे. तसेच सध्या मंडळाच्या नावे असणारी विद्युत मीटर तात्काळ संबंधीत पात्र भाडेकरूंच्या नावे करण्याची कार्यवाही करावी असे आदेश महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास …

Read More »

सरकार स्थिर होण्याआधीच शिवसेनेत एकमेकांविरोधात कुरघोड्या संभावित प्रतिस्पर्धी निर्माण होवू नये म्हणून मुख्यमंत्र्यांकडे परस्पर विरोधी तक्रारी

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्थात महाविकास आघाडी सरकारचे स्थानापन्न होवून दोनच दिवस झाले. मात्र शिवसेनेत आपल्याच जिल्ह्यातील प्रतिस्पर्ध्याला मंत्री पदाची लॉटरी लागू नये यासाठी एकमेकांच्या विरोधात राजकिय षडयंत्र राबविण्याची सुरुवात झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विद्यमान राज्याच्या मंत्रिमंडळात ठाणे जिल्ह्यातील …

Read More »

दिव्यांगांसाठी वेगळा विभाग आणि महापोर्टल बंद करा खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी

मुंबईः प्रतिनिधी दिव्यांगांसाठी सचिव ते जिल्हास्तरावर सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत वेगळा विभाग निर्माण करावा आणि महापोर्टल सेवा बंद करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी व महापोर्टल सेवा बंद करण्याबाबत आज खासदार सुप्रियाताई सुळे यांनी त्यांची भेट घेतली. दिव्यांगाच्या …

Read More »

केंद्राला जाणारा लाखो कोटीचा कर माफ केल्यास महाराष्ट्र कर्जमुक्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची माहिती

मुंबईः विशेष प्रतिनिधी दरवर्षी एकट्या मुंबईतून ३६ ते ४० टक्के करापोटी आणि उर्वरीत महाराष्ट्रातून ४ ते ६ टक्के कर केंद्राला जातो. हा कर साधारणतः दिड ते बावने दोन लाख कोटी रूपयांच्या घरात असून हा कर माफ केल्यास संपूर्ण महाराष्ट्र कर्जमुक्त होवू शकतो अशी माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केली. …

Read More »