Breaking News

एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ मंत्रालयासमोर महिला कार्यकर्त्यांकडून आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला

मुंबई: प्रतिनिधी

मागील काही दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात संपाचे हत्यार उपसत सीएसटीजवळील आझाद मैदानावर आंदोलन सुरु केले. मात्र कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ जनशक्ती संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोर आत्मदहनाची प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी वेळीच कारवाई केल्याने पुढील अनर्थ टळला.

गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळत असल्याचं आता समोर येत आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याची या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. गेल्या आठ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप सुरू आहे.

कामगारांच्या प्रश्नावर काहीच तोडगा निघत नसल्याने आंदोलनकर्त्यांची उद्विग्नता वाढत चालली आहे. एसटी संपाचा आज आठवा दिवस आहे. आपल्या मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू आहे. मागच्या आठ दिवसांपासून कर्मचारी संघटना आणि शिष्टमंडळाच्या परिवहन मंत्र्यांशी चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र अद्याप काहीही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत.

दरम्यान, जनशक्ती संघटनेनेही आज संपाला पाठिंबा देत राज्य सरकारच्या निषेधार्थ मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन केले. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मंत्रालयाच्या मुख्य गेटवर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महामंडळाचे शासनामध्ये विलिनिकरण झालेच पाहिजे, एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. आमच्या न्याय हक्कांसाठी आम्ही गेले अनेक दिवस आझाद मैदानावर बसलो आहे. सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही. आमचे म्हणणं ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांच्या आयुष्याची दैना झाली आहे. तुटपुंज्या पगारात कुटुंब कसे चालवायचं, असा प्रश्न पडलाय, अशा भावना आंदोलनकर्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. दरम्यान, सुट्टीचा दिवस आणि संघटनेने अचानक केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत, परिस्थिती नियंत्रणात आणली.

Check Also

एनसीबी म्हणते, एसआयटी तपास करणार पण कोणाकडून केसेस काढल्या नाहीत ट्विट करत परिपत्रक जारी

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी एनसीबीचे साऊथ वेस्ट झोनलचे डेप्युटी डिजी मुथा अशोक जैन यांनी आर्यन खान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *