Breaking News

देशाच्या पहिल्या पंतप्रधानांची जयंती दिनीच केंद्र सरकारकडून उपेक्षा पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जयंती दिनाच्या कार्यक्रमाला सत्ताधारी गैरहजर

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी

सांसदीय परंपरेनुसार देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या नेत्यांच्या कामाचे आणि योगदानाचे स्मरण होत रहावे या उद्देशाने जयंती आणि पुण्यतिथी दिवस केंद्र सरकारकडून साजरा करण्यात येतो. यासंदर्भात नियमावली नसली तरी ही एक अलिखित परंपरा आहे. परंतु देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती असतानाही संसदेत त्यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय मंत्रीमंडळातील एकही सदस्य आणि राज्यसभा-लोकसभेचे दोन्ही सभागृहाचे अध्यक्ष आणि सभापती गैरहजर राहिल्याने भाजपाकडून पंडित जवाहरलाल यांची त्यांच्या जयंती दिनीच उपेक्षा झाल्याचे दिसून येत आहे.

स्वातंत्र्यानंतर देशाच्या उभारणीत पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पंतप्रधान अटलबिहारी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार आल्यानंतरही पंडित नेहरूंचा अवमान करण्याचा किंवा त्यांच्या योगदानाची उपेक्षा होईल असे कृत्य त्यांच्याकडून करण्यात आले नाही. मात्र यंदाच्यावर्षी पंडित जवाहर लाल नेहरू यांच्या जयंती दिनाच्या कार्यक्रमाला राज्यसभेचे पदसिध्द सभापती व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील एकही मंत्री उपस्थित राहीला नाही. तसेच पंतप्रधानही संसदेतील कार्यक्रमाला हजर राहीले नसल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे या आदरांजलीच्या कार्यक्रमाला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह अनेक नेते संसदेत उपस्थित होते. यासंदर्भात काँग्रेस नेते तथा माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी यासंदर्भात ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. यासंदर्भात लोकसभा सचिवालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर एक फोटो ट्विट करण्यात आला असून त्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातील एकही मंत्री किंवा पंतप्रधान मोदी उपस्थित असल्याचा फोटा ट्विट करण्यात आला नाही.

परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी मात्र पंडित जवाहरलाल नेहरू यांना मात्र ट्विटरवरून नमन करत असल्याचे ट्विट केले.

Check Also

सूरतमधील भाजपा उमेदवार मुकेश दलाल मतदाना आधीच बिनविरोध

सूरत मधील सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपाचे मुकेश दलाल सुरत लोकसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *