Breaking News

“X” मध्ये आली ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंगची सुविधा X च्या माध्यमातून विना नंबर करू शकता ऑडिओ-व्हिडिओ कॉल

X (आधीचे Twitter) ने दीर्घ प्रतीक्षा आणि दीर्घकालीन चाचणीनंतर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग वैशिष्ट्य जारी केले आहे. X चे अनेक वापरकर्ते ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंगचे फीचर पाहू शकत आहेत. अनेक वापरकर्त्यांनी X अॅप उघडताच ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंगची सूचना प्राप्त झाली आहे. त्यामुळे विना मोबाईल नंबर या सुविधानाचा आपण वापर करू शकतो.

वापरकर्त्यांना X अॅपवर “Audio and video calls are here!” नावाचे नोटिफिकेशन मिळत आहे. याशिवाय, अॅप सेटिंग्जमध्ये “Enable audio and video calling” हा नवीन पर्याय देखील दिसून येत आहे, मात्र हे नवीन फिचर केवळ X प्रीमियम वापरकर्त्यांसाठी म्हणजे ब्लु’टीकधारी यांच्यासाठीच आहे की सामान्य वापरकर्त्यांसाठीही आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नवीन अपडेटनंतर, तुम्ही तुमच्या फॉलोअर्ससोबत, तुम्ही फॉलो करत असलेल्या आणि सत्यापित वापरकर्त्यांसोबत ऑडिओ-व्हिडिओ कॉल करू शकाल. तुम्हाला डायरेक्ट मेसेज (DM) मध्ये ऑडिओ-व्हिडिओ कॉलचा पर्याय मिळेल. DM वरून तुम्ही व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉल निवडू शकता. या नवीन फीचर आल्यानंतर एक्स मेटा चे फेसबुक अॅप आणि व्हॉट्सअॅप सारख्या अॅप्सशी स्पर्धा होईल.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *