Breaking News

पंतप्रधान मोदी यांचा सवाल, महाराष्ट्रातील मोठे नेते, पण शेतकऱ्यांसाठी काय केले अजित पवार यांच्या उपस्थितीतच मोदींचा शरद पवार यांच्याबाबत सवाल

राज्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचा शुमारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी झालेल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे आवर्जून उपस्थित होते.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महाराष्ट्रातील एक मोठे नेते आहेत. त्यांचा मी ही वैयक्तिकरित्या आदर करतो. ते कृषी खात्याचे मंत्री होते. पण त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले असा सवाल शरद पवार यांना त्यांचे नाव न घेता केला.

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, त्यांच्या कार्यकाळापेक्षा शेतकऱ्यांनाकडून पीकविण्यात आलेल्या धानाला आम्ही चांगली आधारभूत किंमत दिली. तसेच शेतकऱ्यांचा सन्मान केला. याशिवाय त्या नेत्यांच्या काळात जेवढी धान खरेदी झाली नसेल त्याच्यापेक्षा जास्त धान खरेदी आमच्या काळात करण्यात आल्याचेही आवर्जून सांगत शरद पवार यांचे नाव घेता टीका केली.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांसाठी देय असलेल्या रकमा ऑनलाईन पध्दतीने एका क्लिकच्या माध्यमातून थेट त्यांच्या खात्यावर पाठविली.

तसेच निळवडे धरणाच्या उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, या धरणाला स्वातंत्र्य मिळाल्यावर केंद्र सरकारने मान्यता दिली होती. पण मागील सरकारच्या काळापर्यत निळवडे धरणाचे काम पूर्ण झाले नव्हते. अखेर या धरणाचे काम आम्हीच पूर्ण केले असून त्याच्या पायाभरणीच्या कामाची पायाभरणी करण्याला मीच आलो होतो आणि आता उद्घाटनासाठीही मीच आल्याचे आवर्जून सांगितले.

Check Also

चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडत अजित पवार म्हणाले, शरद पवार यांचा मुलगा…

लोकसभा निवडणूकीच्या काही महिने आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव घेत ७० हजार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *