Breaking News

Security Breach प्रकरणी विरोधक आक्रमकः १५ खासदार निलंबित

संसदेत दोन तरूणांनी घुसखोरी करत आंदोलन लोकसभेच्या सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर तानाशाही नही चलेगी आणि भारत माता की जय अशा घोषणा देत आंदोलन केले. यावरून आणि संसदेची अभेद्य Security Breach (सुरक्षेतील) त्रुटीवरून विरोधकांनी लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत चर्चची मागणी केली. मात्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभा सभापती यांनी प्रश्न विचारणाऱ्या सदस्यांवरच निलंबनाची कारवाई केली.

संसदेची इमारत जूनी झाल्याच्या कारणावरून मोदी सरकारने संसदेची विस्टा सेंट्रल इमारत बांधली. तसेच नव्या संसदेची इमारत ही सुरक्षेच्यादृष्टीने योग्य असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी नव्या संसद इमारतीच्या उद्घाटनावेळी केला होता. परंतु काल संसदेच्या सुरक्षा यंत्रणांना चकवा देत पाच जणांच्या तरूणांनी संसदेत प्रवेश केला. विशेष या तरूणांना भाजपाच्या खासदारानेच संसद प्रवेशाचा पास दिल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले.

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या पाच- सहा जण लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीत कसे पोहोचले, तसेच लोकसभा सभागृहात उडी कशी मारली. याशिवाय सभागृहात उडी मारणाऱ्या दोघांनी धुर पसरविणारे यंत्र बुटात कसे लपवून आणले मग त्यांची योग्य तपासणी झाली नाही का, सुरक्षा यंत्रणांना या वस्तू दिसल्या कशा नाहीत यासह अनेक मुद्दे उपस्थित झाल्याने राज्यसभेत तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी याच मुद्यांवर सरकारकडे चर्चेची मागणी केली. मात्र सभापती जगदीप धनकड यांनी देरेक ओ ब्रायन यांनाच जागेवर बसण्याचे आदेश दिले. तरीही देरेक ओब्रायन यांनी सभापतींच्या आसनासमोर जात चर्चेच्या मागणीवर आक्रमक भूमिका मांडायला सुरुवात केली.

अखेर उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांनी देरेक ओब्रायन यांचे नाव घेत त्यांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात येत असल्याचे जाहिर केले.

तर लोकसभेत कामकाज सुरु होताच संसदेच्या सुरक्षा यंत्रणेतील त्रुटीवरून चर्चा करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. त्याचवेळी सांसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी हे विरोधकांना संसदेच्या सुरक्षा यंत्रणेचा मुद्दा राजकारण करू नका असे आवाहन विरोधी बाकावरील सदस्यांना उद्देशून करत होते. तरीही विरोधकांकडून केंद्र सरकारकडे संसदेच्या सुरक्षेच्या मुद्यावरून चर्चेची मागणी करत सभागृहातच आंदोलन आणि घोषणाबाजी करण्यात येत होती. यात लोकसभेतील डिएमके पक्षाचे बेनी बेहनान, व्हि. के स्रिकांदन, मोहमद जावेद, पी आर नटराजन, के सुबारायण, एस आर पार्थीबन, एस व्यकंटेशन, खासदार कनिमोळी, काँग्रेसचे खासदार मणिकाम टागोर, टी एम प्रतापण, रमया हरिदास, एस ज्योतीमणी, डिन क्योरिओकोस आणि हिबी इडन यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर लोकसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.

काल बुधवारी सहा तरूणांनी संसदेची सुरक्षा व्यवस्था भेदून आंदोलन केलेल्या प्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली. तर त्यातील एक जण पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच सहाही जण एका सोशल नेटवर्कींग साईटच्या माध्यमातून भेटले होते. तसेच साधारणतः दिड वर्षापासून संसदेची सुरक्षा यंत्रणा भेदण्याचे नियोजन या सहा जणांकडून करण्यात येत होते अशी माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे.

काल बुधवारी सहा तरूणांनी संसदेची सुरक्षा यंत्रणा तोडल्यानंतर संपूर्ण संसदेच्या सुरक्षेसाठी पोलिस यंत्रणांचा चारी बाजूने उभ्या करण्यात आल्या. तसेच संसदेच्या सुरक्षा भेदण्याच्या प्रकरणाची केंद्रीय गृह खात्याने कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संसदेची सुरक्षा तोडल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी युएपीए कायद्याखाली गुन्हा नोंदविला आहे.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *