Breaking News

ठाण्याच्या १५ वर्षाखालील प्रणयने आशियाई कुस्तीत मिळविले रौप्य पदक महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक तुरा

मागील काही दिवसात शिवसेनेचे बंडखोर नेते तथा ठाणे जिल्ह्याचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांनी आपल्याच वरिष्ठ नेत्यांना सत्ता संघर्षाच्या लढाईत चितपट करत आपल्या हाती सत्ता राखली. तर दुसऱ्या बाजूला ठाण्याचाच मल्ल असलेल्या प्रणय चौधरी यांने बहारीन येथील आशियाई कुस्ती स्पर्धेत आपल्या अलौकिक कामगिरीने अनेकांचे डोळे दिपवत रौप्य पदक जिंकत महाराष्ट्राच्या मानात आणखी शिरपेच खोवला आहे.

प्रणय चौधरी हा ठाणे जिल्ह्यातील सरवली गावचा मल्ल असून तो गेली तीन ते चार वर्षापासून पै. अमोल बुचडे कुस्ती अकादमी येथे कुस्तीचा अभ्यास करत आहे. विशेष म्हणजे यावेळी पहिल्यांदाच प्रणय चौधरीने आंतरराष्ट्रीयस्तरावरील कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता. तरीही या पहिल्या प्रयत्नातच प्रणय आपल्यातील चुणूक दाखवित रौप्यपदक जिंकल्याने राज्यातील अनेक मल्लांचे आणि तरूणांचे लक्ष्य वेधले आहे.

२ जुलै २०२२ रोजी मनामा बहरीन येथे या ठिकाणी सुरू असलेल्या १५ वर्षाखालील मुलांच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत रुस्तम ए हिंद पै अमोल बुचडे कुस्ती अकादमीच्या पैलवान प्रणय चौधरी याने ५२ किलो ग्रीको रोमन विभाग मध्ये रौप्य पदकाची कमाई केली.

प्रणयची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा असून यामध्ये त्याने रौप्य पदका पर्यंत मजल मारली आहे.

या स्पर्धेच्या प्रथम फेरीमध्ये इराणच्या मल्लाचा २ विरुध्द ० अशा गुण फरकाने पराभव केला. दुसऱ्या फेरीमध्ये तजाकिस्तानच्या मल्लाचा १० विरुध्द २ अशा प्रकारे एकतर्फी पराभव केला. तिसऱ्या फेरीमध्ये किरगिझस्थानच्या मल्लाचा ७ विरुध्द ६ गुणांनी पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला.

उपांत्य पूर्व फेरीमध्ये इराकच्या मल्लावर ६ विरूध्द १ अश्या फरकाने विजय मिळवून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. अंतिम फेरीत कझाकिस्तानच्या मल्ला बरोबर झाली. यामध्ये प्रणयचा निसटता पराभव झाला.

प्रणय हा कुस्ती अकादमीचे संस्थापक पै अमोल बुचडे तसेच कोच नरेंद्र सिंग, पवन गोरे, वस्ताद धोंडीबा लांडगे, किसन बुचडे, विनोद भाऊ गोरे, महेश घुले, मिलिंद झोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

प्रणय कडून यापुढे यापेक्षा सरस कामगिरीची अपेक्षा असल्याचे मत अमोल बुचडे यांनी व्यक्त केले.

Check Also

भ्रष्टाचारप्रकरणी अब्जाधीश महिलेला व्हिएतनाममध्ये थेट फाशीची शिक्षा

व्हिएतनामी रिअल इस्टेट उद्योजिका ट्रुओंग माय लॅन याला देशाच्या सर्वात मोठ्या फसवणूक प्रकरणाच्या संदर्भात हो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *