Breaking News

अखेर “विराट” कामगिरी करत “कोहली”ने तेंडूलकरचा विक्रम मोडला

एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या स्पर्धेतील गट फेरीचे सामने संपले असून, आज होणाऱ्या सामन्याकडे तमाम क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले होते. मागील एक दिवसीय सामन्यात विराट कोहलीने सचिन तेंडूलकर याच्या धावसंख्येची बरोबरी करणार याची उत्सुकता लागून राहिली होती. मात्र विराट कोहलीने त्यांच्या पहिल्याच शतकी केळी करत सचिन तेंडूलकर याचा क्रिकेट सामन्यातील धावसंख्येचा विश्वविक्रम मोडून काढला. विशेष म्हणजे यावेळी सचिन तेंडूलकर हा विरोट कोहलीचा खेळ पाहण्यासाठी खास उपस्थित होता. तेंडूलकरचे विक्रम तोडल्यानंतरच विराट कोहली बाद झाला. तसेच विराट कोहलीबरोबर श्रेयस अय्यर यांनेही शतक झळकाविले.

पहिला उपांत्य सामना बुधवारी१५ नोव्हेंबर रोजी होत आहे. या सामन्यात यजमान भारतासमोर न्यूझीलंडचे आव्हान आहे. चार वर्षांनंतर या फेरीत दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. गेल्या वेळी २०१९ मध्ये किवी संघाने भारतीयांचे स्वप्न भंग करून अंतिम फेरीत धडक मारली होती. त्या पराभवाचा बदला घेण्याण्याचा टीम इंडिया प्रयत्न करणार आहे.

भारताची दुसरी विकेट ३२७ धावांवर पडली. विराट कोहली ११३ चेंडूत ११७ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत नऊ चौकार आणि दोन षटकार मारले. त्याच्या या शानदार खेळीमुळे भारताला ४०० धावा करण्याची संधी आहे. आता लोकेश राहुल श्रेयस अय्यरसोबत क्रीजवर आहे. या दोघांनाही शेवटच्या षटकांमध्ये झंझावाती पद्धतीने धावा करायच्या आहेत.

विराट कोहलीने वन डे कारकिर्दीतील ५०वे शतक पूर्ण केले आहे. यासह त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. यावेळी सचिन तेंडूलकर स्वतः क्रिकेट स्टेडियम मध्ये आवर्जून उपस्थित होता. विक्रम मोडल्यानंतर विराट कोहलीने सचिन तेंडूलकरचे पाया पडल्याचे सांगण्यात येत आहे.

विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडसमोर यजमान भारताने कडवे आव्हान ठेवले आहे. चार वर्षांनंतर या फेरीत दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ३९७/४ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना भारताने चार गडी गमावून ३९७ धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ११७ धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने १०५ धावांची खेळी केली. शुभमन गिलने नाबाद ८० धावा केल्या. कर्णधार रोहितने ४७ आणि लोकेश राहुलने ३९ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने तीन विकेट्स घेतल्या त्याला ट्रेंट बोल्टने एक विकेट घेत साथ दिली.

 

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *