Breaking News

संजय राऊतांचे अमित शाह यांना प्रतित्तुर, शिवसेना अधिक ताकदीने पुढे आली भाजपावर शिवसेनेचा पलटवार

मुंबई : प्रतिनिधी

सिंधुदुर्गमधील खासदार नारायण राणे यांच्या लाईफटाईम वैद्यकिय महाविद्यालयाचे उद्घाटन झाल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. सत्तेच्या मोहात बाळासाहेब ठाकरे यांच्या सिद्धांतांना नदीत सोडले, आम्ही जर तसं वागलो चाललो असतो तर आज शिवसेनाच उरली नसती असा टोला लगावला. त्यास प्रतित्तयुर देत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत जोरदार प्रतित्तुर दिले.

संजय राऊत ट्विट करत म्हणाले की,  “१९७५ मध्ये रजनी पटेल आणि ९० च्या दशकात (मला वाटतं मुरली देवरा) म्हणाले होते की शिवसेना संपेल. पुन्हा २०१२ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील असंच म्हटलं होतं आणि दोन्ही वेळी शिवसेना पूर्वीपेक्षा अधिक ताकदीनिशी पुढे आली. जय महाराष्ट्र..!” अशा शब्दांमध्ये ट्विट करून अमित शाह यांच्या टोल्याला त्यांनी प्रतित्तुर दिले.

 

Check Also

तर ओबीसींच्या डोळ्यात धुळफेक ठरेल…संभाजी बिग्रेडचा प्रस्ताव आल्यावर निर्णय भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मत

पुणे (देहू) : प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारकडून काढण्यात येणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *