Breaking News

सुप्रिया गाणार साईबाबांचे गुणगान सचिनच्या पावलावर पाऊल ठेवत सुप्रियाही बनली गायिका

मुंबई: प्रतिनिधी

सुप्रिया पिळगावकर हे नाव छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांना चांगलंच परिचयाचं आहे. सहजसुंदर अभिनय कौशल्याच्या बळावर सुप्रिया यांनी छोट्या पडद्यावरील चाहत्यांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘क्षितीज ये नहीं’, ‘तू तू मैं मैं’, ‘कभी बीवी कभी जासूस’, ‘तू तोता मैं मैना’, ‘कडवी खट्टी मीठी’, ‘राधा की बेटियां कुछ कर दिखाएंगी’, ‘बसेरा’, ‘ससुराल गेंदा फूल’, ‘लाखों में एक’, ‘मेरी भाभी’, ‘दिल्ली वाली ठाकूर गर्ल्स’ आणि ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ अशा जवळजवळ डझनभर मालिकांमध्ये विविधांगी भूमिका यशस्वीपणे साकारणाऱ्या सुप्रिया आता शिर्डीचे थोर संत श्री साईबाबांचे गुणगान गाताना दिसणार आहेत.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरू असलेली ‘मेरे साई’ ही मालिका आज केवळ साईभक्तांनाच नव्हे, तर सर्व देवभोळ्या प्रेक्षकांचं मन मोहून घेण्यात यशस्वी ठरत आहे. अबालवृद्धांच्या पसंतीस उतरलेल्या या मालिकेत आता सुप्रिया पिळगावकरही दिसणार आहेत. ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेत एका प्रेमळ आईच्या भूमिकेत दिसलेल्या सुप्रिया ‘मेरे साई’मध्ये एका त्रासलेल्या आईची व्यक्तिरेखा साकारत आहेत. या आईने जीवनात खूप दु:ख भोगले आहे. साईबाबांच्या आशिर्वादाने तसंच त्यांची शिकवण आत्मसात केल्याने तिला सुख-शांती प्राप्त होते असे या मालिकेत पाहायला मिळेल.

‘मेरे साई’मधील आपली भूमिका खरोखरच वेगळ्या धाटणीची असल्याचं सांगत सुप्रिया म्हणाल्या की, या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा एक वेगळ्या प्रकारची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली आहे. आजवर साकारलेल्या आईपेक्षा ही आई खूप वेगळी आहे. ‘मेरे साई’ ही मालिका सुरू झाल्यापासून मी ती नियमितपणे पाहाते. कारण ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ ही मालका संपत असताना मीच सोनीवर लवकरच ‘मेरे साई’ ही नवीन मालिका सुरू होणाऱ्या असल्याचे जाहिर केले होते. त्या दिवसापासून या मालिकेचा भाग होण्याची इच्छा होती. एका सामाजिक समारंभात ‘मेरे साई’ मालिकेच्या निर्मात्यांशी माझी योगायोगाने भेट झाली आणि मी त्यांच्याजवळ माझी इच्छा व्यक्त केली. माझी इच्छा ऐकून त्यांना खूप आनंद झाला. दुसऱ्याच दिवशी या भूमिकेसाठी फोन आला आणि आपण ती आनंदाने स्वीकारल्याचे सुप्रिया म्हणाल्या. या मालिकेत अबीर सूफी साईनाथ महाराजांच्या भूमिकेत असून तोरल रसपुत्र, वैभव मांगले, अभिषेक निगम, हेमंत थत्ते आदि कलाकारही या मालिकेत विविध भूमिकांमध्ये आहेत.

 

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *