Breaking News

अवरेज वीज बीलाची फडणवीसांची तक्रार, विधानसभाध्यक्षांचे तातडीने आदेश पुरवणी मागण्यांवरील चर्चेच्या वेळी आदेश दिले

मुंबईः विशेष प्रतिनिधी

राज्यात सत्तास्थानी विराजमान झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमावेळी एक पुस्तिका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते पुस्तिका प्रसिध्द केली. त्या पुस्तकात मुख्यमंत्री लिहितात कि, वर्षभरात सर्व मंत्र्यांनी एकदिलाने एक संवादाने निर्णय घेण्यास सहकार्य केले. मात्र वीज बील सवलतीच्या घोषणेबाबत विसंवाद का असा सवाल उपस्थित करत ज्यांचे घर पुरात वाहून गेले त्या नागरीकाला २ ते ३ हजार रूपयांचे वीज बील दिल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. त्याची तात्काळ दखल विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी घेत अवरेज वीज बील देण्याची पध्दत तात्काळ बंद केली पाहिजे असे निर्देश राज्य सरकारला दिले.

विधानसभेत पुरवणी मागण्यावरील चर्चे दरम्यान फडणवीस हे वीज बील सवलतीच्या मुद्याबरोबर नागरीकांना पाठविण्यात आलेल्या वीज बील वाढीचा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी पटोले यांनी वरील निर्देश दिले.

वर्षपूर्ती निमित्त राज्य सरकारकडून महाराष्ट्र थांबला नाही…थांबणार नाही हे पुस्तक प्रकाशित केले. पुस्तकाचे टायटल सुंदर असून महाराष्ट्राला रोखण्याची किंवा थांबविण्याची ताकद कोणातच नाही. या पुस्तकात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा संदेश आहे. या संदेशात ते लिहितात सरकारमधील सर्व मंत्र्यांनी एकदिलाने निर्णय घेण्यास सहकार्य केले. परंतु वीज बील सवलतीच्या मुद्यावर का विसंवाद दिसून येतोय. याबाबत ऊर्जा मंत्री नितीन राऊत मी तर द्यायला तयारच आहे म्हणतात हा प्रस्ताव अर्थमंत्री अजित पवारांनी नामंजूर केला. अजित पवारांनी विचारले तर ते म्हणतात मुख्यमंत्री ठाकरेंकडे सातवेळा हा प्रस्ताव पाठवला. त्यांनीच नामंजूर केला. मग यात कुठे दिसते ? एकदिल आणि एक संवाद ? असा सवाल उपस्थित केला.

एकाबाजूला वीज बीलात सवलत देण्याची घोषणा केली जाते आणि दुसऱ्याबाजूला नागरीकांना १३ हजार ते ६० हजारापर्यंतची बीले आकारली जात आहेत. आणि ही बीले अवरेज बीले असल्याचे सांगितले जाते. इतकेच काय कोल्हापूरातील चिखली येथे पुरात घर वाहून गेलं त्या घराला २ ते ३ हजाराचे अवरेज वीज काढून पाठवून देण्यात आल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

या मुद्याची विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी तात्काळ दखल घेत अवरेज बिलाची पध्दत तातडीने बंद केली पाहिजे असे निर्देश दिले.

त्यावर सत्ताधारी बाकावरील एका सदस्याने कोणत्या सरकारने केली पाहिजे अशी विचारणा खाली बसून केली. त्यावर सरकार कोणतेही असो ही पध्दत बंद झाली पाहिजे असा पुर्नरूचार पटोले यांनी केला.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *