Breaking News

तीन राज्यात विजयीः नागपूरात मात्र मोदी-फडणवीस यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्याची उपस्थिती विकसित भारत संकल्प यात्रेचा उत्साह फक्त भाजपाच्या कार्यकर्त्ये आणि नेत्यांमध्येच

नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीत काँग्रेसच्या ताब्यातील तीन मोठी राज्ये भाजपाने जिंकली. यात राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात अनेक राजकिय अभ्यासकांच्या अंदाजाला चुकवित भाजपाने एकहाती सत्ता आणली. त्यामुळे देशात अद्यापही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा करिष्मा असल्याचे निवडणूक निकालाने सिध्द करून दाखविले. परंतु महाराष्ट्रातील वजनदार नेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित संकल्प यात्रे निमित्त आयोजित जाहिर सभेला फक्त नेते आणि प्रमुख पदाधिकारीच उपस्थित आणि समोरच्या खुर्च्यांची उपस्थिती असल्याचे ट्विट स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी करत जनसमुदायाचा पाठिंबा किती आहे हे दाखवून दिले.

आज शनिवारी विकसित भारत संकल्प यात्रेचा शुमारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतून ऑनलाईन पध्दतीने केला. तसेच या ऑनलाईन संबोधनाचे प्रक्षेपण थेट देशभरातील प्रत्येक भाजपा कार्यालयात करून देशातील जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

नागपूर शहर आणि जिल्हा हा भाजपा आणि तीची मातृसंघटना राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा बालेकिल्ला मानला जातो. महाराष्ट्रासह देशभरातील अनेक जिल्ह्यात या दोन्ही संघटनांचे जाळे आहे. तसेच मोदी आणि फडणवीस यांच्या सभांना जी गर्दी होते ती या संघटनांच्या पाठबळावरच असे बोलले जाते. मात्र भारताला काहीही करून विकसित भारत करण्याचा दृढ निर्धार केला आहे. त्यातच आगामी तीन महिन्याच्या अंतराने देशभरात लोकसभेच्या निवडणूका होत आहेत. त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी विरोधकांना पुन्हा पराभूत करण्यासाठी सध्या विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.

ऐरवी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सभांना लाखोंची नाही तरी हजारो कार्यकर्त्यांची हजेरी असते. मात्र यावेळी नागपूरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खास उपस्थिती असताना मात्र मोदींच्या सभेला रिकाम्या खुर्च्या आणि भाजपाच्या नेत्यांची मांदियाळीच फक्त उपस्थित असल्याचे हे फडणवीस यांनीच एक्सवरील ट्विट वरून दिसून येते.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *