Breaking News

शेवाळे यांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, नियमामध्ये उत्तर बसत नाही पूरपरिस्थितीबाबत पत्रकार परिषद असल्याचे सांगत बोलणे टाळले

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी पुकारत वेगळी चूल मांडली. त्यानंतर शिवसेनेतील अनेक आमदार, माजी नगरसेवक आणि माजी नेते आणि खासदार शिंदे गटात सहभागी होत आहेत. यापार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या १२ खासदारांनी प्रवेश करताना खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना-भाजपा युतीच्या अनुषंगाने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चर्चा झाली होती. मात्र विधानसभेत भाजपाच्या १२ आमदारांना निलंबित केल्याने युतीची चर्चा फिसकटल्याचा दावा केला.

त्याबाबत सध्या विदर्भातील पूरपरिस्थिचा आढावा घेण्यासाठी नागपूर दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळत फक्त सूचक वक्तव्य केले.

पूरपरिस्थितीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले,

मी आत्ता विभागीय आयुक्त कार्यालयात आहे आणि ही पूरपरिस्थितीची पत्रकार परिषद आहे. त्यामुळे दोन्हींच्या नियमांमध्ये राजकीय प्रश्नांची उत्तरं बसत नाहीत असे सांगत नेमके उत्तर देण्याऐवजी सूचक वक्तव्य केले.

पाऊस आणि पूरस्थितीत अनेक भागात वीज नसल्याबाबत विचारलं असता फडणवीस म्हणाले, सध्या जाणीवपूर्वक काही भागात वीज बंद करण्यात आली आहे. कारण अशा परिस्थितीत अपघात होऊ शकतात, तर काही भागात ट्रान्सफॉर्मरच्या वर पाणी गेलंय. अशा ठिकाणी ते पाणी कमी होईपर्यंत वीज बंद ठेवणंच हिताचं असतं. असं असलं तरी या भागांमधील वीज लवकरात लवकर सुरळीत व्हावी यासाठीही आम्ही आदेश दिले आहेत.

हिंगणघाटसारख्या शहरांचा विचार केला तर येथील मोठ्या भागातील वीज बंद होती. आता टप्प्या-टप्प्याने ही वीज सुरळीत होत आहे. ग्रामीण भागातही तीच स्थिती आहे. जेथे ट्रान्सफॉर्मर पाण्याखाली गेलेत तेथे वीज बंद केली आहे. मात्र, लवकरच ती सुरू होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पुरामुळे पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालंय. काही ठिकाणी लहान पूल कोसळले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे बसेसला फेरा मारून जावं लागेल अशी स्थिती आहे. याबाबत तातडीने करायची काम व दीर्घकालीन कामं याचे अहवाल मागितले आहेत. ती कामं करण्याचा आढावा घेतला जात आहे. मागील आकडेवारी पाहिली तर सप्टेंबर महिन्यात देखील काही प्रमाणात अतिवृष्टी होते. हे चक्र बदललं आहे. आतापर्यंत आपलं काम चांगलं राहिलं असल्याचेही ते म्हणाले.

आपण अनेक लोकांचे जीव वाचवू शकलो. कारण तेथे वेळीच एसडीआरएफ, एनडीआरएफची पथकं पोहचली. त्यांनी लोकांना मदत केली. धरणांवरही बारकाईने लक्ष ठेवलं जातंय. कोणत्या धरणातून किती पाणी सोडल्यावर कुठे किती वेळेत पोहचणार आहे याच्या अंदाजावर सगळं नियोजन केलं जात आहे. यात ढगफुटीसारखी एखादी घटना घडली किंवा जास्त पाऊस पडला तर आपलं नियंत्रण राहत नाही. अशावेळी मदतीचा वेळ कमीत कमी कसा असेल यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

एनजीएसपी पोर्टलवर घेतली जातेय नागरिकांच्या कॉल्सची तत्काळ दखल

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *