Breaking News

राष्ट्रवादीने दिले रामदास कदम यांना प्रत्युत्तर, विश्वासघात योग्य असल्याचे… शिवसेना फोडली... ठाकरे कुटुंबाचा विश्वासघात केला आणि त्याचे खापर राष्ट्रवादीच्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न रामदास कदम व बंडखोर नेत्यांचा आहे - महेश तपासे

बंडखोर आमदारांनी शिवसेना फोडली… मातोश्रीला दगाफटका केला… ठाकरे कुटुंबाचा विश्वासघात केला आणि स्वतःच्या कृतीला योग्य आहे हे दाखविण्यासाठी त्याचे खापर राष्ट्रवादीच्या माथ्यावर मारण्याचा हा केविलवाणा प्रयत्न रामदास कदम व काही बंडखोर नेत्यांचा असल्याचे जोरदार प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले.

२०१९ मध्ये पवारसाहेबांनी राष्ट्रवादी – शिवसेना – कॉंग्रेस या तीन पक्षांची मोट बांधली आणि उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगला कारभार केल्यामुळेच देशाच्या पाच टॉप मुख्यमंत्र्यांच्या यादीत नाव आले आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांना सोडून जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस उध्दव ठाकरे यांच्याच मागे खंबीरपणे उभी आहे. शिंदे गटाने शिवसेना फोडली याचे खरे सूत्रधार भाजपा असून २०१९ मधील जो राग आहे त्यातून हे षडयंत्र सुरू आहे. पोलीस बळ आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर करत आमदार खासदार यांना भयभीत केले गेले आहे, आणि यामध्ये उध्दव ठाकरे कसे चुकले हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. मात्र राज्यातील जनता व शिवसैनिक ज्यांना निवडून दिले त्यांनी मातोश्रीशी कशी गद्दारी केली हे पहात आहे असेही त्यांनी सांगितले.

आज शिवसेना फोडून शिंदे आपली शिवसेना खरी आहे हे सांगत आहेत. मग इतकी वर्षे मातोश्रीचं… स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची मेहनत… उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची शिवसेना वाढीची मेहनत काहीच नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शिवसेना बंडखोर आमदारांनी जी कृती केली आहे ती कृती महाराष्ट्रातील जनतेच्या पचनी पडलेली नाही. उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी निष्ठावान सामान्य शिवसैनिक असल्याने त्यांच्यावर डायरेक्ट टिका न करता राष्ट्रवादीवर तोंडसुख घेण्याचे काम बंडखोर शिंदे गट करत असल्याचा टोलाही त्यांनी रामदास कदम यांना लगावला.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, लोकसभा, विधानसभा यामध्ये महाविकास आघाडी एकत्रित प्रचार करेल व बंडखोरांना व रिमोट कंट्रोल चालवणार्‍या भाजपाचा पराभव होईल ही भीतीही निर्माण झाल्याची खोचक टीका त्यांनी केली.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *