Breaking News

निवडणूकीच्या रिंगणात पहिल्यांदा जाहिर झालेल्या उमेदवाराची पहिली विजयी सलामी कोकण शिक्षक मतदार संघ शेकापकडून हिसकावून घेत भाजपा-शिंदे गटाने राखली

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघासाठी ३१ जानेवारी रोजी मतदान झाले. तसेच २ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सकाळी ११ वाजता कोकणमधील शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडी-शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील आणि ठाकरे गटाने उमेदवारी दिली नाही म्हणून बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केलेले ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात लढत झाली. महाविकास आघाडी विरूध्द भाजपा-शिंदे गट यांच्यात झालेल्या निवडणूकीत पहिली विजयी सलामी कोण देणार अशी उत्सुकता लागून राहिलेली असतानाच भाजपा-शिंदे गटाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना विजय घोषित करण्यात आली. विशेष म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा निम्या मतांनी पराभव झाला. तर ज्ञानेश्वर म्हात्रे यांना २० हजार ६८३ इतकी मते मिळवित विजय मिळविला.

विधानपरिषद निवडणुकीत भाजपाला पहिला विजय मिळाला असून कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रेंनी शेकापच्या बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना २० हजारपेक्षा जास्त मत पडली असून शेकापच्या बाळाराम पाटील यांना केवळ ९ हजार ५०० मतं पडली आहेत. हा महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का आहे. दरम्यान, या विजयानंतर ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

विशेष म्हणजे, विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी कोकणातून भाजपा-शिंदे गटाकडून ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी जाहिर केली. पण, त्यांच्या विजयाच्या घोषणाही निवडणूक आयोगाकडून जाहिर करण्यात आली. सकाळच्या सत्रात भाजपा-शिंदे गटाने दिलेल्या विजयी सलामी दिल्याने शिल्लक ४ ठिकाणी कोणत्या आघाडीचा उमेदवार येणार याविषयी अधिकची उत्सुकता निर्माण झाली.

दरम्यान, विजयी होताच ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले, हा विजय माझा एकट्याचा नसून मतदारसंघातील संपूर्ण शिक्षकांचा आहे. गेल्या सहा वर्षात मी जे काम केलं. त्याची पोचपावती आज कोकण विभागातील शिक्षकांनी दिली आहे. तब्बल ३३ संघटनाचा आम्हाला पाठिंबा होता. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी माझावर जो विश्वास टाकला, तो विश्वास आज सार्थकी लागला आहे असल्याचे सांगत म्हात्रे म्हणाले, ठाकरे गटाची संघटना असलेल्या शिक्षक सेनेने दिलेल्या पाठिंब्याबाबत विचारलं असता, “या निडणुकीत भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना आणि आरपीआय गट या तिघांचा मी उमेदवार होतो. शिक्षक सेना आम्हीच तयार केली होती. कोकणात जेव्हा मी पहिल्यांदा शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी मी स्वत: शिक्षक सेना तयार केली होती, अशी प्रतिक्रिया दिली.

तसेच मी शिवसेनेकडे ( ठाकरे गट) उमेदवारी मागितली होती. पण त्यांनी महाविकास आघाडी म्हणून बाळासाहेब पाटलांना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, त्यानंतर मला भाजपाने सहकार्य केलं आणि त्यामुळे मी त्यांची उमेदवारी स्वीकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *