Breaking News

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबईः प्रतिनिधी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव आणि दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आगामी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात आज घेण्यात आला. यामुळे यंदाचे हिवाळी अधिवेशन गरमच राहण्याची शक्यता आहे.
नागपूर करारानुसार वर्षभरातील एक अधिवेशन नागपूरात घ्यावे असे बंधनकारक आहे. याकालावधीत संपूर्ण राज्याची प्रशासकिय आणि सरकार नागपूरात स्थलांतरीत होते. मात्र यंदाच्या हिवाळी अधिवेशनास कोरोनामुळे अपवाद करत मुंबईतच घेण्यात येणार आहे.
याशिवाय आगामी मुंबईत होणारे अर्थसंकल्पिय अधिवेशन नागपूरात घेण्याचा विचार राज्य सरकारचा आहे.
तसेच मुंबईत होणाऱ्या अधिवेशनाचा कालावधी हा चारच दिवसांचा राहण्याची शक्यता असून ७ डिसेंबर किंवा ९ डिसेंबर या तारखे पासून सुरु होणार आहे. यासंदर्भातील विधिमंडळाच्या सल्लागार समितीची बैठक उद्या होत असून त्यात अंतिम निर्णय अंतिम होणार  आहे.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *