Breaking News

राज्यातील विद्यापीठांमधील शिक्षकेत्तर कर्मचा-यांना ७ वेतन आयोग लागू राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेत्तर कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  सुधारित वेतनश्रेणी १ नोव्हेंबर २०२० पासून लागू होईल.

राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेत्तर कर्मचा-यांना पाचव्या व सहाव्या वेतन आयोगानुसार ज्या पदांची वेतनश्रेणी अचूक आहे तसेच ज्या पदांची पाचव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी योग्य आहे, मात्र सहाव्या वेतन आयोगाच्या अधिसूचनेत सदर वेतनश्रेणीत बदल होऊन त्यानुसार सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी सुधारित झालेली आहे, अशा पदांना पाचव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी आधारभूत मानून त्यानुसार समकक्ष सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी अनुज्ञेय करून त्याप्रमाणे समकक्ष सातव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करण्यात येईल.

राज्यातील ६ अकृषि मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नागपूर)  विद्यापीठात विद्यापीठ स्तरावर मुद्रणालये अस्तित्वात आहेत. या विद्यापीठ मुद्रणालयातील कर्मचाऱ्यांची वेतन देण्याचे दायित्व विद्यापीठ निधीतून देण्यात येते. तथापि अशा कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाच्या सुधारित वेतनश्रेण्या शासन स्तरावरुन लागू करण्यात येतात. विद्यापीठ  मुद्रणालयातील पदांना पाचव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी आधारभूत मानून त्यानुसार समकक्ष वेतनश्रेणी सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी १ जानेवारी २००६ पासून अनुज्ञेय करून त्याप्रमाणे समकक्ष सातव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी १ नोव्हेंबर २०२० पासून लागू करण्यास  मान्यता देण्यात आली. यासाठी होणाऱ्या सुमारे रू.२६८.२३ कोटी एवढ्या वाढीव वार्षिक आवर्ती एवढ्या खर्चास मंजूरी देण्यात आली.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांचा नवा प्रस्ताव, काँग्रेस आणि वंचित एकत्र विधानसभा लढू….

सप्टेंबर – ऑक्टोबरमध्ये विधानसभा आहे. त्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र लढू शकते, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *