Breaking News

इतक्या शाळांना मिळणार अनुदान अनुदानामुळे शिक्षक, कर्मचाऱ्यांना लाभ

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील विनाअनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना पुन्हा एकदा अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर सध्याच्या कोरोना काळामुळे हे अनुदान मिळणे अशक्य वाटत होते. मात्र या शाळांना २० टक्के अनुदान वितरीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या निर्णयाचा एकूण २१६५ शाळांना २० टक्के देण्याचा निर्णय घेतला असून यापूर्वी २० टक्के अनुदान घेतलेल्या शाळांनाही २० टक्के अनुदान घेतलेल्यांनाही अनुदान मिळणार आहे. विशेष म्हणजे हे अनुदान पुढील महिन्यापासून देण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने सांगितले.

सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा एकूण २१६५ शाळांना २० टक्के आणि ह्या याआधीच २० टक्के अनुदान घेणाऱ्या २४१७ शाळांना अतिरिक्त २० टक्के अनुदान १ नोव्हेंबर २०२० पासून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे या विनाअनुदानित शाळांमधील एकूण ४३ हजार ११२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे.

Check Also

विविध घोटाळ्यांची चौकशी करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील अनेक भरती घोटाळ्यांचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआय (CBI) अधिकाऱ्याचा जम्मूमध्ये अपघाती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *