Breaking News

महाविद्यालये व विद्यापीठामंधील १५६० शिक्षकीय पदांना मान्यता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी
उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध महाविद्यालये तसेच विद्यापीठे यांमधील मंजूर पदांपैकी शिक्षकीय रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार १५६० शिक्षकीय पदे लवकरच भरण्यात येणार आहेत.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शिक्षकीय रिक्त पदे भरण्यासंदर्भातला प्रस्ताव उपसमितीच्या बैठकीत ठेवण्यात आला होता. उपसमितीच्या शिफारशीनुसार १५६० पदे भरण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यांनी रिक्त पदे भरण्याचा प्रश्नाचा पाठपुरावा वित्तमंत्री आणि सामान्य प्रशासन विभागाकडे केला होता.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार खालीलप्रमाणे रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये १५ अकृषी व अभिमत विद्यापीठांमधील ६५९ पदे, शासकीय कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात १९७ पदे, नक्षलग्रस्त ५ महिला महाविद्यालयांमधील २९ पदे, शासकीय अभियांत्रिकी व औषध निर्माणशास्त्र (पदवी व पदव्युत्तर) मध्ये ३९८ पदे, अशासकीय अनुदानित अभियांत्रिकी व औषध निर्माणशास्त्र (पदवी व पदव्युत्तर) मध्ये १९२ पदे, अशासकीय अनुदानित वास्तुशास्त्रसाठी २५ पदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामधील ६० पदांना मान्यता दिली आहे.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *