Breaking News

निवड समितीने घेतला शरद पवार यांच्या “अ”-पेक्षे (विरूध्द) निर्णय, प्रफुल पटेल यांची माहिती राजीनामा एकमताने फेटाळला

दोन-तीन दिवसांपूर्वी आपल्या राजकिय आत्मचरित्राच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीसह पुढील भाग प्रसिध्द करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी समितीची घोषणा केली. त्यानंतर शरद पवार यांनी आपल्या राजीनाम्याच्या फेरविचार करावा या मागणीसाठी मागील दोन तीन दिवसापासून नेत्यांसह, पक्ष कार्यकर्त्यांकडून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ठिय्या आंदोलन सुरु केले. तर नेत्यांकडून शरद पवार यांची सातत्याने समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र शरद पवार यांनीच नव्या अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी नेमलेल्या समितीच्या शिफारसीनंतर आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करण्यात आला. त्यानुसार आज ५ मे रोजी मुंबईत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात या समितीची बैठक झाली. यात शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेच्या विरोधात निर्णय घेत तसा ठराव केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल पटेल यांनी बैठकीनंतर दिली.
बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल म्हणाले की, शरद पवार यांनी घेतलेला राजीनाम्याचा निर्णय मी (प्रफुल पटेल) यांनी फेटाळण्याचा प्रस्ताव ठेवला. यावर समितीतील सर्व सदस्यांनी एकमताने प्रस्तावाला मंजूरी दिली. समितीने शरद पवार यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा फेटाळल्यानंतर आता स्वतः शरद पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

बैठकीनंतर समितीने पत्रकार परिषद निर्णयाची माहिती दिली. यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले, शरद पवार आपला निर्णय कार्यक्रमात जाहीर करतील याची अजिबात कल्पना नव्हती. यशवंतराव चव्हाण सभागृहात सर्वांनी आपली भावना व्यक्त केली. त्यानंतरही पक्षाचे ज्येष्ठ मान्यवारांनी शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांना तेव्हापासून विनंती करत राहिलो. देशाला, राज्याला आणि पक्षाला तुमची गरज आहे, अशी विनंती शरद पवारांना केली.

पुढे बोलताना प्रफुल पटेल म्हणाले, शरद पवारांनी कुणालाही विश्वासात न घेता राजीनाम्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनीच नेमलेल्या समितीने त्यांची वारंवार भेट घेतली आणि आज यावर बैठक घेऊन एक ठराव मंजूर केला. यानुसार, शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा विचार केला होता. तो राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांनीच अध्यक्ष म्हणून रहावं, अशी विनंती आम्ही करतो, असंही सांगितलं.

तसेच प्रफुल पटेल यांनी सांगितले की, आम्ही शरद पवारांची भेट घेऊ आणि समितीने घेतलेल्या निर्णयाबाबत त्यांना कळवू. त्यांनी किती काळ अध्यक्ष रहावं याबाबत आम्ही काहीही कालमर्यादा दिलेली नाही. आम्ही काही दिवसांपूर्वीच एकमताने त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली होती, याची आठवणही करून दिली असल्याचेही नमूद केले.

 

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *