Breaking News

सत्तांतरानंतर उध्दव ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकत्रित? राजकिय वर्तुळात भुवया उंचावल्या ठाकरे-फ़डणवीस एकत्रितच विधानभवनात आल्याने चर्चेला उधाण

आमच्या सोबत निवडणूका लढवित कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन धोका दिल्याचा मनात राग होता. त्यामुळे उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पाडलं असा जाहिर गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यानंतर उध्दव ठाकरे यांच्या गटानेही त्यास तोडीस तोड फडणवीस यांना दिले. त्यामुळे भविष्यात उध्दव ठाकरे आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस हे कधीच एकत्र येणे शक्य नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र नेमकं याच्या उलट चित्र विधिमंडळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे हे एकत्रितच प्रवेश करते झाल्याने राजकिय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मागील काही काळात निर्माण झालेल्या वितुष्टामुळे हे दोन्ही नेते एकमेकांकडे तोंड फिरवून पुढे निघून जातील, असे सगळ्यांना वाटत होते. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्यात सारे काही सुरळीत आहे अशा अविभार्वात एकमेकांनी मनमोकळेपणाने गप्पा मारायला सुरुवात केली. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हसतखेळत विधिमंडळाच्या दिशेने चालत गेले. यादरम्यानच्या काळात फडणवीस आणि ठाकरे यांच्या हालचालींमध्ये एकमेकांशी बोलताना कुठलाही अवघडलेपणा जाणवत नव्हता, किमान त्यांनी तो जाणवून दिला नाही. अगदी २०१४ नंतर दोन्ही नेत्यांमध्ये ज्याप्रकारचे सख्य होते, त्याचप्रकारे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकमेकांशी बोलताना दिसले.

उद्धव ठाकरे यांनी विधानभवनाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि तुमची भेट नव्या राजकीय समीकरणांचे संकेत आहेत का, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. यावर उद्धव ठाकरे यांनी वरकरणी मजेशीर वाटत असले तरी सूचक इशारा देणारे भाष्य केले. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ‘पूर्वी खुलेपणा होता. आता बंद दाराआडच्या चर्चा अधिक फलदायी होते असे म्हणतात. आता भविष्यात आमची बंद दाराआड चर्चा झाली तर तेव्हा बोलू. आज सकाळी आम्ही दोघे एकत्र प्रवेशद्वारातून प्रवेश करताना रामराम, हाय हॅलो करतो तसं झालं, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी काढता पाय घेतला.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *