Breaking News

उध्दव ठाकरे म्हणाले, होय मी नैतिकतेला धरून दिला राजीनामा, मग आता तुम्ही… सर्वोच्च न्यायालयाने सरकारच घटनाबाह्य ठरविले असताना मिंधे गटाने आणि फडणवीसांनी राजीनामा द्यावा

राज्यात शिवसेनेतील बंडाळी आणि त्यानंतर निर्माण झालेला सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार घटनाबाह्य असल्याचा निकाल देत जर उध्दव ठाकरे यांनी जर राजीनामा दिला नसता तर घडाळ्याचे काटे आम्ही उलटे फिरवले असते असे स्पष्ट मत व्यक्त केले. या निर्णयानंतर शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उध्दव ठाकरे यांनी मातोश्री या आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत आपल्या निर्णयाचे समर्थन करत होय मी माझ्या नैतिकतेला धरून राजीनामा दिल्याचे सांगितले.

यावेळी मातोश्रीवर पहिल्यांदाच बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव उध्दव ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत तो बोलत होते.

पुढे बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, ज्या पक्षाने त्यांना उमेदवारी दिली, ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडूण आले. त्या गद्दारांनी शिवसेना पक्षप्रमुखाच्या पाठितच खंजीर खुपसला त्या सर्वांनी माझ्यावर अविश्वास दाखविला त्यामुळे मी माझ्या नैतिकतेला धरून राजीनामा दिल्याचे सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, ज्या पध्दतीने मी त्यावेळी माझ्या नैतिकतेला धरून राजीनामा दिला. कारण मला पुन्हा त्याच गद्दार लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी मला मुख्यमंत्री पदावर रहावेसे वाटले नाही. आणि त्यांच्यासाठी मी पदावर राहण्यात काहीच अर्थ नव्हता. म्हणून नैतिकतेला धरून मी राजीनामा दिला. आता अख्ख सरकारचं घटनाबाह्य आणि बेकायदेशीर न्यायालयाने ठरविल्यानंतर आता त्यांनी नैतिकतेला धरून राजीनामा द्यावा असे आव्हानही शिंदे-फडणवीस सरकारला दिले.

तसेच उध्दव ठाकरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने विधिमंडळ पक्षाला प्रतोद नेमण्याचे अधिकार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे माझ्या शिवसेनेच्या सुनिल प्रभू यांचा प्रतोद पदाचा अधिकार न्यायालयानेही मान्य केला आहे. त्यामुळे आता आमचाच व्हिप चालणार असेही स्पष्ट केले.

न्यायालयीन लढाई बाबत बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, माझी लढाई ही मी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी नव्हती. माझी लढाई ही लोकशाहीची रक्षा करणं आपलं काम आहे. मी राजीनामा दिला नसता तर मी मुख्यमंत्री बनलो असतो, असं आज सर्वोच्च न्यायालायने म्हटलं आहे. परंतु, माझी लढाई जनतेसाठी, राज्यासाठी आणि देशासाठी आहे. राजकारणात वाद होत राहतात. परंतु, आपल्या देशाला आणि संविधानाला वाचवायचं आहे. आम्ही सगळे मिळून देशाला गुलाम बणवणाऱ्यांना घरी पाठवणार आहोत, असा इशाराही दिला.

मी दिलेला राजीनामा कायदेशीर चुकीचा असेलही. पण नैतिकतेने ज्या लोकांनी माझ्या वडिलांनी पक्षात सर्वकाही दिलं त्या लोकांना माझ्यावर विश्वास किंवा अविश्वास ठरवायला कसं देऊ? असा उद्विग्न सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांना अधिकारच नाही. त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकारच नाही. गद्दार लोक माझ्यावर अविश्वास आणतील तर मी कसा सामना करणार, असंही उध्दव ठाकरे पुढे म्हणाले.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *