Breaking News

पंतप्रधानांनी उल्लेखलेल्या चित्रपटावरून संजय राऊत यांची टीका, यांना त्याशिवाय पुढे जाताच… प्रोपगंडा फिल्म बनवायची आणि त्यावरून निवडणूकीला सामोरे जायचं

‘द केरला स्टोरी हा चित्रपट शुक्रवारी ५ मे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या कथानकावरून संदर्भावरून आधीच सांशकता व्यक्त करण्यात येत असतानाच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून बराच वाद सुरू सुरू आहे. केरळ राज्य सरकारने या चित्रपटाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाचा प्रोपगंडा करणारा चित्रपट म्हटलं आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून काँग्रेसकडून सातत्याने यावर टीका करण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपा आणि इतर मित्रपक्षांकडून या चित्रपटाचं आणि त्यात दाखवलेल्या वेगवेगळ्या घटनांचं समर्थन करण्यात येत आहे. त्यातच काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील निवडणूक प्रचारा दरम्यान द केरला स्टोरी या चित्रपटाचा उल्लेख केला.

बेल्लारी येथील प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचा उल्लेख करत काँग्रेसवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, दहशतवादी कट असलेल्या एका कथानकावर आधारित हा चित्रपट ‘द केरला स्टोरी’ सध्या खूप चर्चेत आहे. हा चित्रपट केरळमधल्या दहशतवादी कटांवर आधारित आहे. केरळमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कटाचा खुलासा या चित्रपटाने केला आहे.
नरेंद्र मोदी काल बेल्लारीतल्या सभेत म्हणाले, बॉम्ब-बंदूक आणि पिस्तूलाचा आवाज ऐकू येतो. परंतु समाजाला आतून पोखरण्याचा आवाज येत नाही. न्यायालयाने देखील दहशतदाच्या या स्वरुपाबाबत चिंता व्यक्त केल्या आहेत. परंतु आपल्या देशाचं दुर्भाग्य किती आहे बघा, आपल्या समाजाला उद्ध्वस्त करणाऱ्या या आतंकवादी प्रवृत्तीच्या पाठीशी काँग्रेस पक्ष उभा आहे. या दहशतवादी प्रवृत्तींशी काँग्रेस मागल्या दाराने राजकीय सौदेबाजी करत आहे.

या चित्रपटावरून सुरू असलेला वाद आणि काल पंतप्रधानांनी यावरून काँग्रेसवर केलेली टीका यावर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी समाचार घेताना म्हणाले, असे चित्रपट हाच त्यांच्या (भाजपा) प्रचाराचा मार्ग असतो. निवडणूक आली की, अशा प्रकारचे चित्रपट बनवायचे आणि लोकांना दाखवायचे. त्यांनी एक प्रोपगंडा फिल्म बनवली आहे. यामध्ये त्यांचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे हिंदू आणि मुसलमानांचा. या मुद्द्याशिवाय हे लोक निवडणुकीला सामोरे जात नाहीत.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *