Breaking News

मुनगंटीवारांच्या आक्षेपाला “पवार हे मोदींचे गुरू” चे उत्तर राष्ट्रवादीने लिहिले खुले पत्र

मुंबईः प्रतिनिधी
राज्याचे प्रेरणास्थान आणि श्रध्दास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्याने सर्वस्तरातून भाजपावर टीका सुरु झाली. या टीकेला प्रतित्तुर म्हणून माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोदींना आजके शिवाजी म्हटल्याचे चालत नसेल तर शरद पवार यांना रयतेचा राजा म्हटल्याचे कसे चालते असा सवाल केला. त्यास राष्ट्रवादीने खुल्ले उत्तर देत जाणता राजा ही उपाधी महाराष्ट्राच्या जनतेने दिल्याचे सांगत म्हणूनच पंतप्रधान मोदी हे शरद पवार यांना गुरू मानत असल्याचा टोला त्यांनी लागवला.
त्याचबरोबर शरद पवार हे जाणता राजा असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने पुस्तक छापून कधीच केला नाही. याशिवाय पवारांनी आपल्या कारकिर्दीत शेतकरी, कामगार, गोरगरीब जनतेसाठी आयुष्य वेचल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
प्रिय मुनगंटीवार साहेब,
जाणता राजा ही उपाधी देशाचे नेते मा. शरदचन्द्र पवार साहेबांना महाराष्ट्राच्या जनतेने त्यांच्या ५० हुन अधिक वर्ष सार्वजनिक क्षेत्रातून जनसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविल्या बद्दल दिली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या एकही नेत्याने पुस्तक छापून कधीच दिली नाही.
शरद पवार साहेबांना त्यांचे चाहते ‘जाणता राजा’ म्हणतात कारण त्यांनी राज्याच्या शेतकरी, कामगार, आणि गोर गरीब जनतेसाठी आयुष्य वेचले आहे. जनतेच्या प्रश्नांची, समस्यांची जितकी जाण पवार साहेबांना आहे, तितकी कुणालाच नाही. म्हणूनच त्यांना पंतप्रधान मोदी देखील आपला गुरू मानतात.
पवार साहेबांना जाणता राजा म्हटलं तर कोणालाच आक्षेप नाही परंतु नरेंद्र मोदींना आजचे शिवाजी म्हंटल्याबद्दल संबंध महाराष्ट्रालाच संताप झाला आहे.
शेतकऱ्याच्या सर्वात जास्ती आत्महत्या ह्या तुमच्याच राजवटीत झाल्या, हमी भावसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले हे तुमच्याच काळात, मालवाहतुकदारांचा देशव्यापी संप तुमच्या काळातच झाला, देशाची आर्थिक शिस्त ही तुमहीच मोडलीत व देशाला आर्थिक मंदीच्या छायेत ढकललं. छत्रपतींचा एकतरी गुण असता तर तसे झाले नसते. टीका जरूर करा पण वास्तविकतेचा भान ठेवून.
धन्यवाद,
आपला
महेश तपासे,
प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *