Breaking News

बंडातात्यांच्या वक्तव्याची राज्य महिला आयोगाकडून दखल : दोन दिवसात अहवाल द्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे सातारा पोलिसांना आदेश

मराठी ई-बातम्या टीम  

राज्यातील प्रसिध्द किर्तनकार तथा वारकरी चळवळीचे प्रमुख बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून यासंदर्भात दोन दिवसात त्यांच्या वक्तव्यप्रकरणी कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सातारा पोलिसांना दिले.

बंडातात्यांच्या वक्तव्याचा सर्वच पक्षांच्या महिला नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध करत बंडातात्या यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणीही केली. महिलाबाबतचे त्यांचं हे वक्तव्य खपवून घेतलं जाणार नाही. सातारा पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करुन अहवाल दोन दिवसांत सादर करावा, असा आदेश त्यांनी दिले.

बंडा तात्या कराडकर यांनी खासदार सुप्रियाताई सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केल आहे, ते अत्यंत संतापजनक आहे. त्यांच्या या वक्त्व्यामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला व प्रतिष्ठेला धक्का पोचलेला आहे. याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. सातारा पोलीसांनी या वक्तव्याबाबत बंडातात्या कराडकर यांच्यावर कडक कारवाई करून याचा अहवाल ४८ तासाच्या आत महिला आयोगास सादर करावा. तसेच बंडातात्या कराडकर यांनी सात दिवसाच्या आत आपला लेखी खुलासा आयोगास सादर करावा असे आदेशही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेत बंडातात्या कराडकर स्वत:ला कीर्तनकार म्हणवतात आणि अशाप्रकारे स्त्रीत्वाचे धिंडवडे काढतात. स्त्रियांचा जाहिररित्या अपमान करतात. हे खपवून घेतले जाणार नाही अशा इशारा देत त्यांनी जाहीररित्या माफी मागावी. अन्यथा मी पोलिसांना विनंती करते की त्यांनी बंडातात्या यांना जाब विचारावा, त्यांना चौकशीला बोलवावे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

तर खासदार नवनीत राणा यांनीही बंडातात्या यांच्या वक्तव्याचा समाचार घेत आम्ही वाईनच्या विरोधात आहोत. या निर्णयावर महाराष्ट्रातील आम्ही सगळ्या महिला विरोधात आहोत. पण बंडातात्या कराडकर यांचे महिलांबाबतचं वक्तव्य, अशा प्रकारचं बोलणं आम्ही खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला.

त्याचबरोबर नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या रुपाली पाटील यांनीही बंडातात्यांवर जोरदार टीका करत बंडातात्या कराडकर यांनी माफी मागावी. सुप्रिया सुळे या महिलांचं नेतृत्व करतात. त्यामुळे बंडातात्यांनी महिलांचा अपमान केला असल्याने बंडातात्यांनी महिलांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *