Breaking News

राज्यसभा निवडणूकीवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मोठे वक्तव्य आघाडीचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल

महाविकास आघाडी अडचणीत वगैरे काही नाही. महाविकास आघाडीकडे बहुमत आहे. त्यामुळे आघाडीचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
आज शरद पवार यांच्याशी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक झाल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अपक्षांशी विविधस्तरावर चर्चा सुरू आहे. योग्यवेळी याबाबत आपल्याला माहिती दिली जाईल. वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या वेळी लोकांची नाराजी होत असते परंतु समाजवादी पक्ष हा भाजपाविरोधी उत्तर प्रदेशमध्ये राहिलेला आहे आणि त्यांचा मुलाधार तोच आहे. त्यामुळे ते महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देतील अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.

सध्या कोरोनाची साथ आहे. कोरोनामुळे सर्व आमदार हे मुंबईत असावेत आणि मतदानासाठी उपलब्ध असावेत यासाठी हे सर्व सुरु आहे. मतं तर दाखवूनच द्यायची असतात. त्यामुळे कुणी कुणाला पळवण्याचा प्रश्नच येत नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मोर्चेबांधणीचा प्रयत्न भाजप करणारच ना. या निवडणूका बिनविरोध व्हायला हव्या होत्या. जो उमेदवार निवडणूक रिंगणात आहे, तो मतं मिळवण्यासाठी प्रयत्न करणारच त्यात दोष देण्याची गरज नाही. पण मुळातच महाविकास आघाडी सरकारला सुरुवातीला १७० आमदारांनी पाठिंबा दिलेला होता. त्यामुळे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आज विधानसभेच्या सर्व सदस्यांना महाविकास आघाडीकडून सूचना गेल्या आहेत. बहुसंख्य आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. त्या सर्वांसाठी ही बैठक होती असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान विधानपरिषदेसाठी चर्चा सुरू असून दोन जागा आमच्या असून दोन जागांसाठी चर्चा सुरू आहे. त्याचा योग्यवेळी निर्णय जाहीर करु असेही त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे राज्यातील मनसे, भाजपा आणि शिवसेनेचे नेते अयोध्या दौऱ्यावर जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या केदारनाथ मंदिरात भेट देत सहकुटुंब दर्शन घेतले. तेथून परतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहिले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *