Breaking News

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, त्यांचा उमेदवार म्हणून प्रीट हिट द्यायची अन् आम्ही काय केल तर…

सध्या क्रिकेटचे दिवस आहेत. त्यामुळे त्याचे काही नियम असतात. तशी निवडणूक असली की त्याची आचारसंहिता असते. मात्र नुकतेच मध्य प्रदेशातील निवडणूक प्रचारा दरम्यान देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी धर्माच्या आणि अयोध्या वारीच्या नावावर मतं मागितल्याचे सर्वांनी पाह्यलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाने आपल्या नियमात बदल केला असेल तर तो सर्वांना समान पध्दतीने लागू करावा अशी मागणी करत त्यांचा उमेदवार म्हणून प्री हिट द्यायची अन् आम्ही काही तर नियम दाखवायचे असे चालणार नाही असा इशारा देत यासंदर्भात आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्याचे सांगितले.

शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने वांद्रे येथील मातोश्री या निवासस्थानी आयोजित उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या मध्य प्रदेशच्या निवडणूकीचा प्रचार सुरु आहे. या निवडणूक प्रचारा दरम्यान, देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अयोध्या वारीवरून जनसमुदायाला विचारले की, अयोध्या वारी करायची असेल तर खर्च येणार की नाही असा सवाल केला. त्यावर लोकांनी होय खर्च येणार असे सांगितले. त्यावर अमित शाह यांनी जर भाजपाचे सरकार आले तर अयोध्या वारीचा खर्च येणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. तर कर्नाटकातील निवडणूकीत दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजरंग बली की जय अशी घोषणा दिली. तरीही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कोणतीच दखल घेतली नाही असा आरोपही केला.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक नियमानुसार धर्माच्या नावावर निवडणूक लढता येत नाही. पण केवळ आम्हीच खरे हिंदूत्ववादी म्हणून फक्त मध्य प्रदेशमधील जनतेसाठी बिगर खर्चाची अयोध्या वारीला न्यायाचे आणि बाकिच्यांना नाही असे करू नका असे सांगत मी तर म्हणेन की, अमित शाह यांनी फक्त मध्य प्रदेशपुरता विचार करू नका तर देशातील राम भक्त असलेल्या कोणालाही त्याला जेव्हा वाटेल त्या दिवशी अयोध्येला जाऊन राम भक्ताचे दर्शन घेता आले पाहिजे अशी मागणी करत पण त्याला कोणताही खर्च आला नाही पाहिजे अशी मागणीही केली.

तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपध्दतीवर बोलताना उद्घव ठाकरे म्हणाले, आम्हाला निवडणूक आयोगावर टीका करायची नाही. पण त्यांनी निवडणूकीच्या नियमात कोणते बदल केले असतील तर त्यांनी त्याची माहिती द्यावी आणि त्यानुसार सर्वांना समान संधी द्यावी अशी मागणीही केली.

तसेच यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाला आज गुरुवारी सकाळी पत्र पाठविल्याची माहितीही उद्धव ठाकरे यांनी दिली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, केंद्रीय निवडणूक आयोगानेही सर्वांना समान संधी द्यावी अन्यथा त्यासंदर्भात सरकारी भाषेत देशातील जनतेला माहिती द्यावी असे आवाहनही केले.

निवडणूक आयोगाच्या अधिकाराबाबत बोलत असताना उद्धव ठाकरे म्हणाले, १९८७ साली संपूर्ण देशात पार्ल्याची पोटनिवडणूक झाली. त्या निवडणूकीत हिंदूत्वाच्या एकमेव मुद्यावर शिवसेनेने नुसतीच लढविली नाहीतर तर ती जिंकलीही होती. त्यावेळी भाजपा शिवसेनेच्या विरोधात होती. त्या निवडणूकीत गर्व से कहो हम हिंदू है असा कोणीही दिला असला तरी तो बुलंद केला बाळासाहेबांनी. केंद्रीय निवडणूक आयोगाने या घोषणेवरून निवडणूक आयोगाने बाळासाहेब ठाकरे यांच्यासह ७ जणांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला होता. तसेच निवडणूक आयोगाने त्यावेळी करप्ट प्रॅक्टीसेस असा आरोप ठेवला होता अशी आठवणही सांगितले.

देशाचा गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जर अयोध्या वारी आणि बजरंग बली की जय अशा घोषणा निवडणूकीत देत असेल तर केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांच्या नियमात बदल केला असावा. त्यामुळे त्याची माहिती निवडणूक आयोगाने द्यावी अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *