परळी मतदार संघात २०१ बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आले शाई लावायची आणि बाहेर जायचे मतदान केंद्राच्या आत मध्ये तुमचे बटन दाबण्याचे काम ही गँग करायची असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ गटनेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत म्हटले आहे. यावेळी परळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजेसाहेब देशमुख …
Read More »शरद पवार यांचा सवाल, कमी मते मिळवणाऱ्या पक्षाला ४१ तर ७२ लाख वाल्याला फक्त १० जागा विधानसभा निवडणुकीतील मतांबाबत व्यक्त केले आश्चर्य
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आज कोल्हापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन परिषदेतून विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना पहिल्यांदाच मतदानाच्या आकडेवरून शंका उपस्थित केली. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, उद्या मारकडवाडी येथे जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधणार आहे. निवडणुकीत …
Read More »महाराष्ट्रातील पराभवानंतर महाविकास आघाडीत बिघाडी, शिवसेना उबाठा स्वबळावर? स्वबळावर निवडणूका लढविण्याची भूमिका
केंद्रात स्थानापन्न असलेल्या भाजपाच्या राजकिय भूमिकेच्या विरोधात लढण्यासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाठा, आणि काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणूकीत चांगल्यापैकी यश मिळाले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षांना पराभवाची नामुष्की स्विकारावी लागली. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाकडून …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, मतदानाची वेळ संपल्यावर ७.८३ टक्के मतांची वाढ झाली कशी? निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारामुळे आयोगाच्या निष्पक्ष व पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह; लोकशाहीसाठी धोक्याची घंटा
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर व चिंताजनक प्रकार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झाले, त्याच रात्री ११.३० वाजता ते ६५.०२ टक्के तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ टक्के झाल्याचे सांगितले, यात एकूण ७.८३ टक्के वाढ झाल्याचे …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा, … तर दोनच आमदार शिल्लक राहतील वेंद्र फडणवीस यांना आव्हान दिल्यास...
उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देण्याची भाषा यापुढे करू नये. यापुढे फडणवीस यांना आव्हान द्याल तर निवडून आलेल्या २० आमदारांपैकी १८ जण तुमची साथ सोडून निघून जातील, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिला. मुंबईत पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »उद्धव ठाकरे यांचा टोला, काल झालेला स्फोट चार दिवस आधी झाला असता तर… मतमोजणीच्या एक दिवस आधीच भाजपाचा पदाधिकारी शिवसेना उबाठात
पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे मित्र उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकन न्यायालयाने भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिल्याच्या प्रकरणावरून अटक वॉरंट अमेरिकन न्यायालयाने काढले. त्यावरून देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. या प्रकरणावरून काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांकडून याप्रकरणी गौतम अदानी आणि भाजपावर टीका केली. याप्रकरणाला जवळपास दोन तीन दिवसाचा कालावधी उलटून गेल्यानंतर शिवसेना …
Read More »विधानसभा मतदानाच्या आकडेवारीत तिसऱ्यांदा सुधारणाः १ टक्क्याने मतदान वाढले पुरूष, महिला व तृतीयपंथी यांची अंतिम आकडेवारी जाहीर
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या २८८ मतदारसंघांकरिता २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान झाले. या मतदानात एकूण ६ कोटी ४० लाख ८८ हजार १९५ मतदारांनी आपला सहभाग नोंदविला असून यामध्ये एकूण ३ कोटी ३४ लाख ३७ हजार ५७ पुरूष, ३ कोटी ६ लाख ४९ हजार ३१८ महिला तर १ हजार …
Read More »रमेश चेन्नीथला याचा विश्वास, काँग्रेस महाविकास आघाडी स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन करेल मुख्यमंत्रीपदावरून कोणताही वाद नाही; निकालानंतर चर्चा करुन निर्णय घेऊ
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेचा कौल महाविकास आघाडीलाच मिळेल व स्पष्ट बहुमतासह काँग्रेस महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे. टिळक भवनमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्रातील जनता काँग्रेस व महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे …
Read More »मतमोजणीचा दिवसः महायुती-महाविकास आघाडीकडून अपक्षांशी वाढला संपर्क महाविकास आघाडीला काटावर, महायुती बहुमतापासून दूर
राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडत आहे. या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर अनेक खाजगी कंपन्यांनी एक्झिट पोलचे अंदाज जाहिर करत राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीला मिळणाऱ्या जागांचे अंदाज वर्तविले आहे. यापैकी एखादं-दुसरा अपवाद वगळता बहुतांष एक्झिट पोल जाहिर करणाऱ्यांनी महायुतीच्या बाजूनं विधानसभेतील बहुमताचा आकडा टाकला …
Read More »आघाडी- युतीपासून लांब राहणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांचे मोठे वक्तव्य संख्याबळ मिळाले, तर सत्ता स्थापन करू शकणाऱ्या सोबत राहणार
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या कालावधीत आणि लोकसभा निवडणूकी दरम्यान भाजपाप्रणित महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीपासून लांब राहणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मोठे वक्तव्य करत सत्ता स्थापन करू शकणाऱ्या सोबत राहणार असल्याचे जाहिर केले आहे. लोकसभा निवडणूकीच्या वेळी महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला सोबत …
Read More »