तसे पाह्यला गेलं तर कोणत्याही गोष्टीचा इव्हेंट करणाऱ्या भाजपा नेत्यांच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृतीशील परंपरेत खंड पडला नाही. राजस्थान आणि छत्तीसगड येथील काँग्रेसची सत्ता भाजपाने हिसकावून घेतली. तसेच मध्य प्रदेशमधील शिवराज सिंग चौव्हाण यांच्या नेतृत्वाखालील भाजपाची सत्ता ऐतिहासिक विजय मिळवित कायम राखली. मात्र काँग्रेसला तेलंगणा राज्यात मिळालेला विजय भाजपा नेत्यांच्या जिव्हारी चांगलाच लागलेला असल्याचे नवी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात जमलेल्या भाजपा कार्यकर्ते, नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातून स्पष्ट जाणवत होते.
राजस्थानमध्ये काँग्रेसच्या हाती असलेली सत्ता भाजपाने हिसकावून घेत आणि सत्तेची सारी सुत्रे पुन्हा एकदा आपल्या हाती ठेवण्यात भाजपाला यश मिळाले. त्यानंतर छत्तीसगड आणि मध्य प्रदेश मध्ये भाजपाच्या विरोधात वातावरण असतानाही काँग्रेसला पराभूत करत विजयश्री खेचून घेतली. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने दिल्लीतील मुख्यालयात विजयोत्सवाचा कार्यक्रम आय़ोजित करण्यात आला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्यालयात आगमन झाल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून स्वागत करताना फारसा उत्साह दाखविला जात नव्हता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सर्वात आधी भारत माता की जय अशी घोषणा दिली. परंतु भाजपा कार्यकर्त्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुमचा आवाज तेलंगणा राज्याच्या जनतेपर्यंत पोहचायला पाहिजे असे आवाहन केल्यानंतर पुन्हा घोषणा देताना भाजपा कार्यकर्त्यानी जोरदार प्रतिसाद दिला.
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, या वेळच्या निवडणूकीत विरोधकांकडून जाती-पातींचा आधार घेत निवडणूकीत यश मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु मी चारच जाती मानतो असे सांगत युवा शक्ती, स्त्री शक्ती, गरिब, शेतकरी या चार जातींनाच मानतो. या निवडणूकीत त्यांचीच लढाई होती. त्यानुसार या चारही जाती जिंकल्या असून देशातील या शक्ती भाजपासोबत असल्याने भारत देश आणखी सशक्त होऊ शकतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले की, तेलंगणात पराभव झालेला असला तरी, भाजपाचा आलेर हा वर जाणारा आहे. मी तेलंगणाच्या नागरिकांना विश्वास देतो की, भाजपा तुमच्या सेवेत कोणत्याही सेवेत कसूर ठेवणार नाही असे सूचक वक्तव्य केले.
Speaking from the @BJP4India headquarters. https://t.co/wlVWHoY3mF
— Narendra Modi (@narendramodi) December 3, 2023