देशातील पाचपैकी चार राज्यातील निवडणूकांचे निकाल आज जाहिर झाले. छत्तीसगड, राजस्थान बरोबर मध्य प्रदेश मध्येही काँग्रेसला कौल मिळेल अशी वातावरण निर्मिती करण्यात आली होती. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडूनही भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या आतापर्यंतच्या कारभारावरून प्रश्न उपस्थित करत चांगलेच कोंडीत पकडत होते. त्यामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबाबत एक आश्वासक वातावरणही निर्माण झाल्याने काँग्रेसमध्ये आशादायक परिस्थिती निर्माण झाली.
मात्र चार राज्यांची मतमोजणी पूर्ण होत निकाल जसजसे जाहिर होत होते. तसे भाजपाच्या उमेदवारांना मिळणारी मते पाहता भाजपाला तीन राज्यांमधील जनतेने कौल दिल्याचे दिसत होते. त्यानंतर दुपारी १२ नंतर तीन राज्यात भाजपा स्पष्टपणे बहुमताचा आकडा पार करत असल्याचे चित्र दिसायला लागले. तर तेलंगणामध्ये सत्ताधारी बीआरएस पराभवाच्या छायेत असल्याचे आणि काँग्रेसला एकहाती सत्ता मिळत असल्याचे स्पष्ट झाले.
या सगळ्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी एक्सवरील त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर आपली प्रतिक्रिया देत म्हणाले, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान मधील जनतेने दिलेला कौल आम्ही नम्रपण स्विकारत आहोत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनती काम आणि दिल्ल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले.
तसेच राहुल गांधी पुढे म्हणाले, परंतु वैचारीक लढाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचा निर्धार जाहिर करत तेलगंणाला यापुढील काळात दयाळू तेलंगणा म्हणून प्रजाळू तेंलगणा निर्माण करण्याचे आश्वासना पूर्ण करणार असल्याचे ठाम मतही यावेळी व्यक्त केले.
मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ और राजस्थान का जनादेश हम विनम्रतापूर्वक स्वीकार करते हैं – विचारधारा की लड़ाई जारी रहेगी।
तेलंगाना के लोगों को मेरा बहुत धन्यवाद – प्रजालु तेलंगाना बनाने का वादा हम ज़रूर पूरा करेंगे।
सभी कार्यकर्ताओं को उनकी मेहनत और समर्थन के लिए दिल से शुक्रिया।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 3, 2023