Breaking News

गृहमंत्री वळसे-पाटील यांची घोषणा, लकडावालाकडून घेतलेल्या कर्जाची चौकशी ईओडब्लू कडून चौकशी होणार

हनुमान चालिसावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांनी शिवसेनेसह थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आव्हान दिले. त्यामुळे त्यांना दोन गटात तणाव निर्माण केल्याप्रकरणी आणि शासकिय यंत्रणांना आव्हान दिल्याप्रकरणी त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा नोंदवित त्यांना तुंरुगात रवानगी केली. त्यानंतरही नवनीत राणा यांनी थेट लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवित आपणास पोलिसांनी योग्य वागणूक दिली नसल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी खार पोलिस ठाण्यातील तो व्हिडिओ प्रसारीत करत राणांच्या आरोपातील हवाच काढून घेतली. मात्र आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून त्यांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
नवनीत राणा यांच्या आरोपातील मुंबई पोलिस आयुक्तांनी हवा काढून घेतल्यानंतर राणा यांनी पुन्हा यु टर्न घेत आपणाला खार नव्हे तर सांताक्रुज येथील पोलिस ठाण्यात वाईट वागणूक मिळाल्याचा दावा त्यांच्या वकीलामार्फत केला. मात्र शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आज सकाळी नवनीत राणा यांच्या निवडणूक प्रतिज्ञा पत्रातील मालमत्ता आणि कर्जाची माहिती असलेली कागदपत्रे ट्विटरद्वारे प्रसारीत केली. त्या कागदपत्रांमध्ये दाऊद इब्राहीमच्या गॅंगशी संबधित युसूफ लकडावाला याच्याकडून ८० लाख रूपयांचे कर्ज नवनीत राणा यांनी घेतल्याची बाब त्यांच्या प्रतिज्ञा पत्रात लिहील्याचे उघडकीस आले. या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांबरोबर ईडीनेही करावी अशी मागणी केली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याची मागमी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनीही पोलिस आणि ईडीनेही चौकशी करण्याची मागणी केली.
त्यानंतर आज रात्री राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना नवनीत राणा यांनी लकडवाला याच्याकडून घेतलेल्या ८० लाख रूपयांची चौकशी करणार का असा सवाल केला असता त्यांनी या प्रकरणाची ईओडब्लू कडून करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
त्यामुळे नवनीत राणा यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे. युसुफ लकडावाला हा दाऊद इब्राहीम याच्या गॅंगशी संबधित होता आणि त्याला अटक करून तुरुंगातही डांबण्यात आले होते. त्यामुळे देशद्राही व्यक्तींशी व्यवहार केल्याप्रकरणी राणा यांच्यावर कारवाईही होवू शकते.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *