Breaking News

शिवसेनेच्या मदतीने प्रसाद कांबळींच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ नाट्य परिषदेच्या निवडणूकीत शिवसेना उपनेते डॅा. अमोल कोल्हे यांचा पराभव

मुंबई : प्रतिनिधी

२०१८ ते २०२३ या कालावधीसाठी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषेचे नवे अध्यक्ष कोण बनणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. दिवंगत अभिनेते मच्छिंद्र कांबळी यांचे चिरंजीव नाट्यनिर्माते प्रसाद कांबळी यांच्या गळ्यात नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाची माळ पडली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणूकीत त्यांच्या विरोधात उभे असलेल्या मोहन जोशी पॅनलच्या डॅा. अमोल कोल्हे यांचा कांबळी यांनी पराभव केला आहे. विशेष म्हणजे या अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत शिवसेना पक्षाचे उपनेते असलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांना मदत करणार की निवडणूकीत मदत केलेल्या प्रसाद कांबळी यांना करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र अखेर शिवसेनेने प्रसाद कांबळी यांना मदत करत नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात घातली.

४ मार्च रोजी झालेल्या निवडणूकीत कांबळी यांच्या आपलं पॅनलने वर्चस्व सिद्ध केलं होतं. मोहन जोशी पॅनलला मागे टाकत आपलं पॅनलने बाजी मारली होती. आता अध्यक्षपदाच्या निवडणूकीतही आपलं पॅनलने मोहन जोशी पॅनलवर मात केली आहे. पुढील पाच वर्षे म्हणजेच २०१३ पर्यंत कांबळी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाचा कारभार पाहतील.

शरद पोंक्षे प्रमुख कार्यवाह म्हणून काम पाहतील, तर सुनील ढगे, सतीश लोटके आणि अशोक ढेरे यांची सहकार्यवाह पदावर निवड झाली आहे. जगन्नाथ चितळे – कोषाध्यक्ष, तर नरेश गडेकर – उपाध्यक्ष उपक्रम आणि डॅा. गिरीश ओक – उपाध्यक्ष प्रशासन अशी निवडून आलेल्या इतर पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. मधुरा वेलणकर, शंकर निमकर, भरत जाधव, अविनाश नारकर, शेखर बेंद्रे, राजन भिसे, मंगेश कदम, संदीप जंगम, आनंद खरवस, उज्वल देशमुख, गिरीश महाजन अशी एकूण ११ सदस्यांची कार्यकारणी समिती निवडण्यात आली आहे.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *