Breaking News

वादग्रस्त जागेवरील राम मंदीर उभारणीचा मुद्दा विरोधकांचा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे घुमजाव

मुंबई : प्रतिनिधी

उत्तर प्रदेशातील वादग्रस्त वास्तू पडल्यानंतर राम मंदीर उभारणीबाबचा मुद्दा भाजपच्या प्रत्येक निवडणूकीच्या जाहीर नाम्यात प्रसिध्द करण्यात आला आहे. मात्र त्या वादग्रस्त जागेवर राम मंदीर उभारणीबद्दल भाजप कधीच बोलत नसल्याचा खुलासा करत त्या वादग्रस्तच्या जागेवर राम मंदीर उभारणीबाबत विरोधकांकडूनच केला जात असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सांगत राम मंदीर बाबरी मस्जिदच्या जागेवर करण्याबाबतच्या भाजपच्या भूमिकेबाबत त्यांनी घुमजाव केले.

भाजपच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित महामेळाव्यानंतर बीकेसी येथीलच सोफीटेल या पंचतारांकीत हॉटेल मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते.

याचबरोबर देशाला काँग्रेस मुक्त करण्याची घोषणा भाजपकडून करण्यात आल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, आम्ही काँग्रेस मुक्त भारत अशा अर्थाने ती घोषणा केली नव्हती. तर ती काँग्रेसी संस्कृती मुक्त भारताच्या निर्मितीच्या अनुषंगाने करण्यात आल्याचे सांगत काँग्रेस मुक्त भारताच्या मुळ घोषणेपासूनही त्यांनी पुन्हा घुमजाव केले.

त्याचबरोबर विरोधकांना कुत्ता, बिल्ली असे बोलल्याने कुणाचे मन दुखावले असेल तर ममता बँनर्जी, सपा, बसपा पक्षांची नावे घेत असल्याचे सांगत विरोधकांना जनावरांची उपमा दिल्याबद्दल अप्रत्यक्षरित्या समर्थन केले.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *