Breaking News

उध्दव ठाकरे यांचा बंडखोरांवर निशाणा, तुम्हाला माझे वडीलही चोरायचेत आणि पक्षही… एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरांवर केली टीका

शिवसेनेतील फुटीनंतर आता शिवसेना नेमकी कोणाची यावरून बंडखोर गटाचे मुख्यंत्री एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्यातील संघर्ष आता चांगलाच सुरु झालेला आहे. त्यातच निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या दोन्ही गटांना ८ ऑगस्टपर्यत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले. यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बंडखोर एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधत म्हणाले, तुम्हाला माझे वडीलही चोरायचेत आणि पक्षही चोरायला निघाले आहेत. तुम्ही कसले मर्द असा टोलाही लगावला.

शिवडी येथील शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यासाठी उध्दव ठाकरे आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

शिंदे गटाने आता थेट निवणूक आयोगाकडे धाव घेत आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. याची दखल घेत निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष संघटनेतील बहुमत येत्या ८ ऑगस्टपर्यंत कागदोपत्री सिद्ध करा, असे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहेत.

त्यांना शिवसेनेला संपवायचे आहे. पण ठाकरे आणि शिवसेना हे नाते घट्ट राहणार. तुमच्या कित्येक पिढ्या उतरल्या तरी त्यांना पाताळात गाडून आम्ही येऊ. त्यांना शिवसेना आणि ठाकरे हे नाते तोडायचे आहे. ही बंडखोरी नाही. ही हरामखोरी आहे. हा नमकहरामीपणा आहे. एवढीच मर्दुमकी असेल तर माझ्या वडिलांचा म्हणजेच शिवसेनाप्रमुखांचा फोटो लावू नका. हिंमत असेल तर स्वत:च्या नावाने मतं मागा, असे आव्हानही त्यांनी शिंदे गटाला दिले.

तुम्हाला वडील चोरायचे आहेत. पक्षही चोरायला निघाले आहात. तुम्ही कसले मर्द आहात. अशा लोकांच्या हातात महाराष्ट्र, मुंबई आणि तुमचे आयुष्ये देणार आहात का? न्यायालयात खटला सुरु आहे. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. त्यांनी आम्हीच खरी शिवसेना आहोत असे निवडणूक आयोगाला सांगितले आहे. पण हे सगळं कारस्थान आहे, त्याला जल्लोषाने उत्तर देऊन चालणार नाही. मला प्रत्येक पदाधिकाऱ्याचे शपथपत्र हवे आहे. माझ्यासह गटप्रमुखाचे शपथपत्र पाहिजे, असे ते शिवसैनिकांना उद्देशून म्हणाले.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *