Breaking News

भारतीय क्रिकेटपटूचा इंग्लडने केला असाही सन्मान सुनिल गावस्करचे नाव लिन्चेस्टर येथील मैदानाला

क्रिकेट हा खेळ तसे पहायला गेले तर तो इंग्लंडचा या भारतावर राज्य करत असताना ब्रिटीशांनी या खेळाची पाळेमुळे देशात पसरवली. मात्र हा खेळ फक्त ब्रिटीशांचा न राहता तो भारताबरोबर अनेक देशांचा झाला. परंतु क्रिकेटमधील भारतीय खेळाडूच्या कामगिरीची दखल आता दस्तुरखुद्द ब्रिटीशांनी घेत तेथील एका स्टेडियमला चक्के भारतीय खेळाडूचे नावच दिले.

स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांमध्ये या स्थितीमध्ये अमूलाग्र बदल झाला आहे. इंग्लंडमधील एका क्रिकेट मैदानाला भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांचे नाव देण्यात आले आहे.

इंग्लंडमध्ये भारतीय क्रिकेटला इंग्लंडमध्ये मोठा मान मिळाला आहे. लिंचेस्टर क्रिकेट मैदानाला सुनील गावस्कर यांचे नाव देण्यात आले आहे. शनिवारी (२३ जुलै) हे नाव देण्यात आले. इंग्लंडमधील एखाद्या क्रिकेट मैदानाला ​​भारतीय क्रिकेटपटूचे नाव देण्याची ही पहिलीच वेळ आहे. लिंचेस्टर क्रिकेट मैदानाचे नाव बदलण्याची मोहीम भारतीय वंशाचे खासदार किथ वाझ यांनी सुरू केली होती. त्यांनी ब्रिटिश संसदेत दीर्घकाळ लिचेस्टरचे प्रतिनिधित्व केलेले आहे.

गावसकर म्हणाले, मला खूप आनंद झाला आहे. लिसेस्टरमधील एका मैदानाला माझे नाव देण्यात आले आहे. लिंचेस्टरमध्ये क्रिकेटला प्रचंड पाठिंबा मिळतो. माझ्यासाठी हा खरोखरच मोठा सन्मान आहे.

तर, खासदार किथ वाझ म्हणाले, गावसकर हे जगातील महान क्रिकेटपटूंपैकी एक आहेत. ते केवळ ‘लिटल मास्टर’च नाही तर क्रिकेटमधील ‘ग्रेट मास्टर’देखील आहेत. गावसकर हे कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारे पहिले भारतीय खेळाडू होते. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर होता. त्यांचा हा विक्रम सचिन तेंडुलकरने मोडला. गावस्कर यांनी भारतासाठी एकूण १२५ कसोटी सामन्यांमध्ये ३४ शतके झळकावलेली आहेत.

परदेशामध्ये गावसकर यांचा सन्मान होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, अमेरिकेतील केंटकी येथील एका मैदानाला ‘सुनील गावस्कर फील्ड’ असे नाव देण्यात आलेले आहे. याशिवाय टांझानियातील जंजीबारमध्येही ‘सुनील गावसकर क्रिकेट स्टेडियम’ तयार केले जात आहे.

Check Also

अखेर मालदीव बरोबरचे संबध दृढ करण्यासाठी चीन घेतोय पुढाकार

साधारणतः दोन महिन्यापूर्वी मालदीव मधील निवडणूका पार पडल्या या निवडणूकीत भारतीय वंशाचे मोहम्मद मोईझु यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *