Breaking News

शहिद निनाद मांडवगणे यांच्या कुटुंबियांची विरोधी पक्षनेत्यांनी घेतली भेट सरकारबरोबरच प्रवरा परिवारही पाठीशी उभारणार असल्याची मांडवगणे कुटुंबियांना ग्वाही

नाशिक : प्रतिनिधी

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी वीरवैमानिक शहिद निनाद मांडवगणे यांच्या परिवाराची आज नाशिक येथे सांत्वनपर भेट घेतली. तसेच राज्य सरकारबरोबरच प्रवरा परिवार त्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याची ग्वाही विखे-पाटील यांनी मांडवगणे कुटुंबियांना दिली.

शहिद निनाद मांडवगणे हे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सिन्नर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. त्यामुळे निनादच्या हौतात्म्याने प्रवरा परिवारातही शोककळा पसरल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी यावेळी सांगितले. मांडवगणे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरी देशसेवेसाठी त्यांच्या पत्नीने लष्करात जाण्याची दाखविलेली तयारी अभिमानस्पद असल्याचे ते पुढे म्हणाले.

या कुटुंबाच्या पाठीशी संपूर्ण देश खंबीरपणे उभा आहेच. या दुःखातून सावरण्यासाठी शासन त्यांना नियमानुसार मदत करेलच. सोबतच प्रवरा परिवार देखील मांडवगणे कुटुंबाच्या पाठीशी सदैव उभा असेल, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. याप्रसंगी सर विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. रेड्डी, काँग्रेस नेते शैलेश कुटे आदी मंडळी उपस्थित होते.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *