Breaking News

८० वर्षे वयावरील सेवानिवृत्तीधारक, निवृत्तीवेतनधारकांना अतिरिक्त निवृत्तीवेतन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी
शासनाने ८० वर्षे व त्यावरील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना ज्या महिन्यात त्यांची वयाची ८०/८५/९०/ आणि १०० वर्षे पूर्ण होतात त्या महिन्याच्या १ तारखेपासून वाढीव दराने निवृत्तीवेतन/ कुटुंब निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
वय वर्षे ८० ते ८५ दरम्यान ज्यांचे वय आहे त्यांना मूळ निवृत्तीवेतनात १० टक्के, ८५ ते ९० वय असलेल्यांना १५ टक्के, ९० ते ९५ वय असलेल्यांना २० टक्के, ९५ ते १०० वय असलेल्यांना २५ टक्के आणि वय वर्षे १०० पेक्षा अधिक असलेल्या सेवानिवृत्तीधारकांना किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना मूळ निवृत्तीवेतनात ५० टक्के वाढ देण्याचा निर्णय शासनाने यापूर्वीच घेतला आहे.
वित्त विभागाने ३० जुलै २०१९ रोजी निर्गमित केलेल्या शासननिर्णयान्वये वरील वय वर्षांच्या टप्प्यात सेवानिवृत्ती तसेच कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना अतिरिक्त वाढीव निवृत्तीवेतन देण्याची कार्यवाही कशा पद्धतीने करावयाची आहे, वेतन आयोगाचे लाभ देतांना कशाप्रकारे त्याची निश्चिती करावयाची आहे याची उदाहरणासह माहिती दिली आहे.
ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे, व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठे यामधून सेवानिवृत्त झालेल्या व ८० वर्षे व त्यापुढील निवृत्ती/ कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनाही हा निर्णय लागू राहील असेही वित्तमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

Check Also

प्रियंका गांधी यांचा सवाल,… तर रोजगार व महागाईची समस्या का सोडवली नाही ?

देशात आज सर्वात जास्त महागाई व बेरोजगारी आहे, केंद्र सरकारमध्ये ३० लाख सरकारी पदे रिक्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *