Breaking News

राष्ट्रवादीची शिवस्वराज्य…’नव्या स्वराज्याचा नवा लढा’ यात्रा ६ ऑगस्टपासून २२ जिल्हे, ८० तालुके आणि ३ हजार किलोमीटरचा प्रवास करणार असल्याची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घोषणा

कोल्हापूरः प्रतिनिधी
राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात ६ ऑगस्टला होणार असून शिवरायांच्या जन्मस्थळी शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नरपासून सुरु होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली.
ही शिवस्वराज्य यात्रा ६ ते २८ ऑगस्टला राज्यातील २२ जिल्हे, ८० तालुके आणि ३ हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे.
शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून शिवस्वराज्य सनद सादर केली जाणार असून हाच पक्षाचा जाहीरनामा महाराष्ट्रातील लोकांपर्यंत घेवून जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याची आर्थिक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. रयतेच्या हाताला काहीच लागलेले नाही. वीजदरवाढ, टोलमुक्त महाराष्ट्र या घोषणाच राहिल्या आहेत असा आरोपही त्यांनी केला.
या यात्रेत बेरोजगार युवकांची नोंदणी केली जाणार आहे. त्यांच्या भविष्याचा विचार यातून सक्षमपणे केला जाणार आहे. युवकांच्या हाताला काम देणं, राज्यातील सगळ्या थरातील व्यवस्थेला मदत करण्याची भूमिका असणार आहे. ही शिवस्वराज्य यात्रा कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही. घोर फसवणूक, युवकांची निराशा यावर प्रकाश टाकण्यासाठी आणि रयतेच्या हितासाठी ही शिवस्वराज्य यात्रा असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र, देश लोकशाहीने चालतो. सरंजामशाही शाहीचा काळ कधीच संपला आहे. परंतु संरजामशाहीला अपवाद होता तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. त्याकाळातही या युगपुरुषाने रयतेचे राज्य आणले. शेकडो वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान कोट्यावधी लोकांच्या हदयात आदराचे आहे. सर्व घटकांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादीच्यावतीने शिवस्वराज्याची सनद देवून आम्ही काय देवू इच्छितो यासाठी ही सनद घेवून जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *