Breaking News

उध्दव ठाकरेंचा मोदींना इशारा, केंद्राची भीक नकोय, मुंबई ही कष्टकऱ्यांची यांचा डोळा मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर

शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न झाल्यानंतर मुंबईतील विविध विकास कामांच्या शुमारंभ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकांमध्ये पैसा ठेवून विकास होत नसतो असे मोठे विधान केले. या वक्तव्याचा धागा पकडत ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले, यांचा डोळा मुंबई महापालिकेने विकास कामे करून इतकी वर्षे जो शिल्लक राहिला तो बँकांमध्ये ठेवला. त्यांचा डोळा त्या बँकामधील पैशावर असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात ते बरोबर आहे की बँकामध्ये पैसा ठेवून विकास कामे होत नाहीत. मात्र पालिकेकडून उभारण्यात येत असलेल्या कोस्टल रोड ला कोणताही टोल मुंबईकरांना भरावा लागणार नाही. त्यासाठी तो पैसा असल्याचे प्रत्युतर दिले.

मुंबईला केंद्रावर अवलंबून रहावे म्हणून भाजपाचा आटापीटा सुरु आहे. मात्र मुंबईला केंद्राकडून मिळणाऱ्या भिकेची गरज नाही. मुंबई ही कष्टकऱ्यांची असून ती कष्टकऱ्यांच्या बळावर समर्थ असल्याचे उध्दव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. उध्दव ठाकरे यांनी अंधेरी येथे उत्तर भारतीय समाजाशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, मुंबईला दासी करण्याचा भाजपाचा डाव आहे. प्रत्येक गोष्टीसाठी भिकाऱ्यासारखं कटोरा घेऊन तुमच्या दारात उभं राहिलं पाहिजे अशी यांची अपेक्षा असल्याचा आरोपही यावेळी केला.

यावेळी उध्दव ठाकरे म्हणाले, एक गोष्ट नक्की की मागील २५-३० वर्षांपेक्षाही जास्त तुम्ही आणि आम्ही एकमेकांचे विरोधक होतो. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना. मी उत्तर भारतीय आणि महाराष्ट्रीय नाही म्हणत. मग असं काय घडलं की आम्ही तर हिंदुत्ववादी होतो, आजही मी म्हणतो की मी हिंदू आहे, मी हिंदुत्व कधी सोडले नाही आणि सोडणारही नाही. मी तर भाजपाला सोडलंय हिंदुत्व नाही सोडलं. भाजपा म्हणजे हिंदुत्व नाही आणि त्यांचं जे हिंदुत्व आहे ते आमचं हिंदुत्व नाही. ते आम्हाला मान्य नाही मी उघडपणे सांगतो. जे माझ्या वडिलांनी मला शिकवलं ते हिंदुत्व हे नाही. माझ्या वडिलांच्या भाषेत सांगायचं तर राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व आहे. आमचं जे हिंदुत्व आहे ते देशाची जोडलेलं आहे. परंतु यांचं हिंदुत्व सांगतं की आपसात भांडणं लावा, कुटुंबात भांडणं लावा, पक्षात भांडणं लावा आणि सत्ता मिळवा अशी टीकाही केली.

मोगॅम्बो काल म्हणाला की मी मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटले. पण आत्ता जे काही राज्यात चाललं आहे त्यात कोण कोणाचं काय चाटतं आहे? तेच कळायला मार्ग नाही असा उपरोधिक टोला शिंदे गट आणि अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता खोचक शब्दांमध्ये उत्तर दिले. तसेच पुढे बोलताना म्हणाले, आता जे काही राज्यात सुरू आहे ती कुठली चाटुगिरी आहे? कोण कोणाचा कुठला भाग चाटतो आहे? असा खोचक सवालही विचारला.

बंडखोर शिंदे गटावर निशाणा साधताना उध्दव ठाकरे म्हणाले, माझ्या पक्षातले काही लोक दुसरीकडे गेले. माझेच लोक मला माझ्याच घरातून बाहेर काढू पाहात आहेत. त्यांना आता मालक व्हायचं आहे. आमचा निवडणूक आयोगही असा आहे की चोरांना मालक केलं आहे. आज सगळ्या विरोधी पक्षांनी डोळे उघडले पाहिजेत कारण आज जे आमच्यासोबत झालं ते उद्या तुमच्यासोबत होईल. यांना बाळासाहेब ठाकरेंचा चेहरा पाहिजे पण त्यांचा मुलगा नको अशी टीकाही केली.

ज्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेला धोका दिला त्यांना तळवे चाटणारे चालतात का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला.

Check Also

काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर म्हणाले, वर्षा गायकवाड माझ्या लहान बहिण

लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीवरून काहीसे नाराज झालेल्या काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *