Breaking News

राजकारण

विधान परिषदेत खडाजंगी: नीलम गोऱ्हे म्हणाल्या, तुम्ही मंत्री तुमच्या घरी हे सभागृह आहे.. उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना झापले !

विधान परिषदेत सभागृहात आज दुसऱ्या दिवशी एका तारांकित प्रश्‍नावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर उत्तर देत असतांना विरोधकांचे समाधान झाले नाही. या प्रश्‍नावरून विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या वेळी पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे खाली बसून बोलू लागले. त्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. ‘मंत्री गुलाबराव पाटील हे दादागिरी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा; गोविंदासाठी नोकरीत आरक्षण, स्पर्धेतील बक्षिसे सरकार देणार दहीहंडी सणाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत केली घोषणा

दरवर्षी दहीहंडी उत्सव मुंबईसह राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा होतो. मात्र या सणा निमित्त सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकातील अनेक जण जखमी होतात किंवा मृत्युमुखी तरी पडतात. मात्र दहीहंडी हा खेळ साहसी खेळात समाविष्ट करण्यात येणार असून खेळताना गोविंदाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना १० लाखाची मदत तर हात किंवा पाय मोडल्यास ५ …

Read More »

बोटीत शस्त्रास्त्र साडल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली ‘ही’ माहिती बोट वाऱ्याने हरिहरेश्वरच्या किनारी

आज श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरच्या समुद्रकिनाऱ्यावर एक १६ मीटर लांबीची बोट स्थानिकांना आढळून आली. स्थानिक रहिवाशांनी ही माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, बोटीची पाहणी केली असता, या बोटीत ३ एके-४७ रायफल आणि काडतूस तसेच बोटीची कागदपत्रे आढळून आली. त्यानंतर तत्काळ हायअलर्ट जारी करण्यात आला. तसेच याची माहिती भारतीय …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही, परवडणारी हक्काची घरे देण्यासाठी कटिबद्ध पुणे म्हाडाच्या ५ हजार २११ घरांच्या सोडतीचा शुभारंभ

सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बांधकामाच्या दरात म्हाडा घरे उपलब्ध करुन देत असून म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून पोलीस निवासस्थाने तसेच सर्वसामान्यांना परवडणारी हक्काची घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पुणे मंडळ म्हाडाच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या ५ हजार २११ घरांच्या सोडतीचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »

छगन भुजबळ यांचा खोचक टोला, आता “स्कूल चले हम – जीएसटी के साथ” म्हणाव… महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची भावना दिल्लीत पोहोचवा

जीएसटी परिषदेने सुचविलेल्या दरवाढीला देशभरात विरोध होत आहे. ही तांत्रिक दरवाढ आहे असे उत्तर सरकारकडून दिले जात असले, तरी आताच ती करणे टाळता आले असते आणि राज्यातील आणि देशातील जनतेला या महागाईला तोंड द्यायची वेळ आली नसती छोट्या छोट्या गोष्टींवर जीएसटी लावणे हे अन्यायकारक असून किमान अन्नधान्य, शालेय साहित्य व हॉस्पिटल बिलावरील …

Read More »

नाना पटोले म्हणाले, शेतकऱ्यांना डिझेलवर सबसीडी द्या जीएसटीवरील चर्चे दरम्यान केली मागणी

महागाईने जनता त्रस्त असून पेट्रोल, डिझेलचे दर अजूनही जास्तच आहेत. शेतकरी नेहमीच संकटाचा सामना करत असतो. शेतीसाठी ट्रॅक्टरचा वापरही मोठ्या प्रमाणावर केला जातो तसेच इतर शेती कामासाठीही डिझेलचा वापर केला जातो. सध्याचे डिझेलचे दर जास्त असून शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत. राज्य सरकारने डिझेलवर शेतकऱ्यांना सबसीडी देण्याचा विचार करून बळीराजाला दिलासा द्यावा, …

Read More »

अजित पवार यांचा सवाल, शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींनी काय करायचं? सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे, हे कृतीतून दाखवा...

राज्यात दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यापासून मागच्या ४५ दिवसात १३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींनी काय करायचं? शेतकऱ्यांना का हे सरकार आपल्या जवळचे वाटत नाही याचे उत्तर मिळाले पाहिजे. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी धोरणे राबवा अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी …

Read More »

छगन भुजबळ म्हणाले, सध्या दोनच दाढी एक पांढरी दाढी अन् काळी दाढी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काढला चिमटा

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस. आज दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारने मंजूर केलेले जीएसटी विधेयक विधानसभेतही मंजूर करण्याच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जीएसटी विधेयक मांडले. त्यावरील चर्चेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाढीवरून चिमटा काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना केली. सत्ताधारी …

Read More »

पावसाळी अधिवेशन: गद्दारांना ताट – वाटी… चलो गुवाहाटी ईडी सरकार हाय हाय.. फसवी मदत जाहीर करणार्‍या सरकारचा धिक्कार असो...

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उध्दव ठाकरे गटाच्या आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. विधानसभेच्या पायऱ्यावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी केली. ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा… ईडी सरकार हाय …

Read More »

प्रश्नोत्तराच्या पहिल्याच तासात आणि पहिल्याच प्रश्नावर शिंदे सरकारच्या मंत्र्याची दांडी गुल अजित पवार यांच्या पहिल्याच प्रश्नाला उत्तर न देता आल्याने प्रश्न राखून ठेवण्याची पाळी

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात केलल्या प्रश्नांच्या भडीमाराची उत्तरे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना देता न आल्याने, शिंदे सरकारच्या कारकिर्दीतील पहिलाच प्रश्न उत्तरासाठी राखून ठेवण्याची नामुष्की शिंदे सरकारवर आली. आता या प्रश्नाचं उत्तर सरकारकडून सोमवारी दिले जाणार आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, …

Read More »